कोल्हापूर; छत्रपती घराण्यावर टीका करणाऱ्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेचा निषेध

Protest against Adv Gunratan Sadavarte in kolhapur
Protest against Adv Gunratan Sadavarte in kolhapur
Updated on

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या व छत्रपती घराण्यावर टीका करणाऱ्या ऍड. गुणरत्न सदावर्ते याचा शहरातील बारा बलुतेदार-अठरा अलुतेदारांसह छत्रपतीप्रेमी कार्यकर्त्यांनी आज निषेध केला. त्याची प्रतिमा फाडून संताप व्यक्त करण्यात आला. "एक मराठा लाख मराठा,' "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,' "छत्रपती शिवाजी महाराज की जय,' "राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय,' अशा घोषणांनी परिसर या वेळी दणाणून गेला. महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याशेजारी निषेध व्यक्त करण्यात आला.
 
ऍड. सदावर्ते यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे. त्यांनी छत्रपती घराण्यावरही टीका केली आहे. मराठा समाजाला अन्य कोणाचे आरक्षण हिसकावून घ्यायचे नाही. किंवा ज्या घटकांना आरक्षण दिले आहे. त्यांच्याविरोधात मराठा समाज नाही. केवळ हक्काचे आरक्षण मिळावे, इतकीच मराठा समाजाची मागणी आहे, अशी भूमिका मांडत कार्यकर्ते आज दुपारी चार वाजता दसरा चौकात एकत्र आले. त्यांनी सदावर्ते यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मिरजकर तिकटी येथून मराठा कार्यकर्ते सदावर्ते यांची प्रतिमा घेऊन चौकात दाखल झाले.

छत्रपती घराण्यावर टीका झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतिमा तेथेच फाडली. या वेळी प्रा. जयंत पाटील व प्रसाद जाधव यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची आवश्‍यकता स्पष्ट केली. 

या वेळी माजी नगरसेवक विनायक फाळके, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, गणी आजरेकर, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, सुभाष देसाई, सचिन क्षीरसागर, शिवाजी लोंढे, उदय कुंभार, शिवाजी कदम, योगेश माजगावकर, प्रदीप माने, संपत चव्हाण, प्रवीण पोवार, सुनील टिपूगडे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, रणजित पोवार, शामराव शिंदे, अमर भालकर, प्रकाश सरनाईक, जयकुमार शिंदे, चंद्रकांत पोवार, संदीप थोरात, आबराम वाघमारे, दिनकर जाधव उपस्थित होते. 


 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com