esakal | 'राज्य सरकारनं वचन पूर्ण करावं'; समरजितसिंग घाटगेंचे शेतकऱ्यांसाठी उपोषण

बोलून बातमी शोधा

protest in kolhapur of samarjitsinh ghatge for farmers support in kolhapur}

आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि तेथून ते थेट दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन उपोषणाला बसले आहेत.

kolhapur
'राज्य सरकारनं वचन पूर्ण करावं'; समरजितसिंग घाटगेंचे शेतकऱ्यांसाठी उपोषण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी सकाळी राज्य सरकारच्या विरोधात उपोषण सुरु केले. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे त्याचबरोबर वीजबिलात माफी मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी आज सकाळी दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण केले. प्रशासनाने या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. तरीही त्यांनी उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि तेथून थेट दसरा चौकात आले. याठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. समरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते. 

उपोषणावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की,  हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही आहे. इथे लोकांच्या न्यायासाठी एकटा बसलो आहे. लोक पाठिंबा द्यायला आले आहेत. मी कोणाला आवाहन केलेले नाही. कोणत्याही मंडप किंवा माईक शिवाय हे आंदोलन आहे. राज्य सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली. ते म्हणाले की, मी राज्यासाठी न्याय मागत आहे. तसंच हे कोणत्याही प्रकारचं राजकीय आंदोलन किंवा कार्यक्रम नाही. राज्य सरकारने जनतेला जे वचन दिले आहे ते पूर्ण करावं यासाठी मी उपोषण करत आहे.

हेही वाचा - वाह रे पठ्ठ्या! रिक्षाचालकाच्या मुलाने पटकावली 2 कोटीची फेलोशिप, राज्यातील पहिलाच -

संपादन - स्नेहल कदम