राज्यभर विविध जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळला जातो पण, हा जनता कर्फ्यू म्हणजे नक्की काय?

public curfew information kolhapur Curfew voluntarily declared by the public
public curfew information kolhapur Curfew voluntarily declared by the public

कोल्हापूर : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. यावरती उपाय म्हणून शहरा बरोबरच आता ग्रामीण भागातही दक्षता घेण्यासाठी राज्यभर जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. मात्र अनेकांना  जनता कर्फ्यू म्हणजे काय याची माहिती नसते.अनेकजण संभ्रमात असतात.काय  आहे जनता कर्फ्यू , तो कोणासाठी राबवणार हे जाणून घेऊया....


जनतेने स्वेच्छेने घोषित केलेली संचारबंदी
 याला प्रशासनाचा अधिकृत पाठिंबा आहे का?
-नाही
 

पोलिस व्यवस्था रस्त्यावर येऊन पुन्हा प्रतिबंध करणार का?
-नाही

 चलन, व्यापार,व्यवसाय, उद्योग, सेवा, पुरवठा हे अधिकृत बंद केल्याच जाणार का?
-नाही.  येथे संबंधित घटकाने स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे.
 

जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका, पालिका, ग्रामपंचायत किंवा एखाद्या शासकीय अधिकारी वा कर्मचारी या बंद मध्ये सहभागी असणार का?
नाही.

केंद्र सरकारने पुन्हा लॉकडाउन कोणत्याही यंत्रणेने करू नये व करण्याचे असल्यास त्याला केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

 मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी अधिकृतपणे जनता संचारबंदीसाठी लोकांनावर सक्ती लादू शकतो का?
नाही. हे वर्तन केंद्र सरकारच्या एकात्मिक मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध आहे.

मला जनता संचारबंदीमध्ये सहभागी झाले नाही म्हणून शासन होऊ शकते का?
नाही.

जनता संचारबंदीत सहभागी होणे किंवा नाही हा पूर्णपणे व्यक्तीगत निर्णय आहे. कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.
 जबरदस्ती केली तर काय करावे?


पोलिस ठाण्यात तक्रार देवू शकता, न्यायालयात दाद मागू शकता.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com