पुण्याचा महेंद्र "नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री' 

Pune's Mahendra Chavan  "Nagaradhyaksh Maharastra Shri' Kolhapur Marathi News
Pune's Mahendra Chavan "Nagaradhyaksh Maharastra Shri' Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील नगरपालिका आणि गांधीनगर युथ सर्कलतर्फे आयोजित शरिर सौष्ठव स्पर्धेत पुण्याचा महेंद्र चव्हाण याने पहिल्या "नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री' चषकावर आपले नाव कोरले. त्याला एक लाखाचे रोख पारितोषिकासह चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, बीड, धुळे, औरंगाबाद येथून 125 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी पाच लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली होती. 

स्पर्धेतील फर्स्ट रनरअपचा बहुमान मुंबईचा अनिल बिल्वा तर सेकंड रनरअप म्हणून पुण्याचा महेश जाधव याला गौरविण्यात आले. त्यांना अनुक्रमे 35 व 20 हजाराची बक्षीसे देण्यात आली. मिस्टर आशिया सुनित जाधव, नगरसेवक महेश कोरी यांच्या हस्ते नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री चषक विजेत्याला प्रदान केला. स्पर्धेसाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनने सहकार्य केले. मिस्टर एशिया सुनित जाधव आणि मिस्टर वर्ल्ड संग्राम चौगुले यांनी हजेरी लावून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी गडहिंग्लज शहरासह परिसरातील तरूणाईने म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाचे मैदान हाऊसफूल्ल झाले होते. 

खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. गोडसाखरचे चेअरमन ऍड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष शकुंतला हातरोटे, ऍड. सुरेश कुराडे, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत आपटे, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार, राजेश वडाम, गांधीनगर युथ सर्कलचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश कोरी, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेताजी पालकर, झाकीर नदाफ यांचा विशेष सत्कार झाला. नगरसेवक महेश कोरी यांनी प्रास्ताविकात स्पर्धेमागील हेतू स्पष्ट केला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. 

स्पर्धेचा निकाल गटनिहाय असा : 55 किलो गट- राजेश तारवे (मुंबई), अवधूत निगडे (कोल्हापूर), नितीन शिगवण (मुंबई), सुधीर गायकवाड (सातारा), ज्ञानेश्‍वर सोनवणे (पुणे). 60 किलो : नितीन म्हात्रे (ठाणे), अरूण पाटील (मुंबई), योगेश दिमटे (पुणे), शुभम मोहिते (सातारा), गणेश पारकर (मुंबई), 65 किलो : केदार पाटील (सीमाभाग), फैय्याज शेख (साताराम), रौफ शेख (बीड), दीपक मुलकी (मुंबई), अक्षय गरूड (धुळे). 70 किलो : दिनेश कांबळी (ठाणे), तौशिफ मोमीन (पुणे), उमेश पांचाळ (मुंबई), प्रताप कलकुत्तीकर (सीमाभाग), शुभम भोईटे (साताराम). 75 किलो : महेश जाधव (पुणे), अफ्रोज ताशिलदार (सीमाभाग), अर्जून कुचीकोरवी (मुंबई), नौशाद शेख (पुणे), गणेश दुसारिया (औरंगाबाद). 80 किलो : अनिल बिल्वा (मुंबई), भास्कर कांबळी (मुंबई), संजय मालुसरे (साताराम), प्रभाकर पाटील (औरंगाबाद), अभिषेक खेडेकर (मुंबई). 85 किलो : मल्लेश धनगर (पुणे), आदील बागवान (सातारा), सोहेल शेख (बीड), संकेत लंगरकर, कृष्णा गोरे (कोल्हापूर). खुला : महेंद्र चव्हाण (पुणे), रोहित चव्हाण (सीमाभाग), हरपज रजपूत (धुळे), प्रविण पॉल, तुषार गवळी (ठाणे). 
मेन्स फिजीक (170 से.मी खालील) : विजय हाप्पे (मुंबई), ख्रिस जॉन, रोहित शर्मा, अरबाझ शेख, रामा गुरव (सर्व पुणे). 170 से.मी. वरील : गोकूळ वाकुडे (पुणे), संजय मकवाना (ठाणे), मयुरेश्‍वर पाटील (पुणे), गौरव यादव (सातारा), शुभम कानडू (मुंबई), वुमेन्स फिजीक : मयुरी पोटे, निधी सिंघ, काजोल भाटीया (सर्व ठाणे). प्रत्येक गटातील पाचही विजेत्यांना प्रत्येकी 10000, 7000, 5000, 3000 व 2000 रूपये व चषक तर मेन्स फिजीकमधील 170 से. मी. उंची वरील व खालील या दोन गटातील विजेत्यांना 27 हजार तर वुमेन्स फिजीकमधील विजेत्यांनाही रोख बक्षीसे दिली. 

कागलप्रमाणेच निधी द्या... 
भाषणात नगराध्यक्षा कोरी यांनी शहरातील नाट्यगृह, क्रीडा संकूल आदी विकासकामांसाठी मंडलिक, मुश्रीफ यांच्याकडे निधीची अपेक्षा व्यक्त केली. नविद यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी शहरासाठी देण्याची ग्वाही दिली. श्री. मंडलिक म्हणाले, क्रीडा संकूल उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी कागलला दहा तर गडहिंग्लज व मुरगूड पालिकेला पाच कोटी दिले. मुश्रीफ यांनी गडहिंग्लज व मुरगूडलाही कागलइतकाच निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांत हशा पिकला. तसेच पहिल्यांदाच गडहिंग्लजला इतक्‍या मोठ्या प्रमाणातील स्पर्धेच्या संयोजनाबद्दल नगरपालिका आणि महेश कोरींचे कौतूकही पाहुण्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com