अबब!  कारलं खायचाय, मग मोजा तब्बल एवढे पैसे! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

दीड वर्षात पहिल्यांदा कारले महागले.

कोल्हापूर  : आज कारल्याचा दर 120 रुपये किलो झाला. कारलं 50 ते 60 रुपये किलोपेक्षा जास्त कधीही जात नाही. दीड वर्षात पहिल्यांदा कारले महागले. गेल्या आठवड्यात लसूण आणि आल्लं 80/100 रुपये किलो मिळत होते. आज लसूण/आल्ल्याचा दर प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढला. अन्य भाज्यांची आवक कमी आहे. लाल भोपळ्याची आवक मात्र वाढली आहे, पालेभाज्यांचे दर अजूनही जास्त आहेत. 

भाजीपाला दर (प्रतिकिलो रुपये) 
कारले (120), दोडका (80), लाल भोपळा (40/50 रुपयाला एक नग), वाल भाजी (50), कांदा (15), बटाटा (30), भेंडी (40), लसूण (120), आल्लं (120), शेपू-मेथी-पोकळा-लाल माट-तांदळी (20 ते 25 रुपयाला दोन नग), पडवळ (10 रुपयाला एक नग), तोंदली (50), महाबळेश्‍वर गाजर (60/70), काकडी (40), हिरवी मिरची (40), टोमॅटो (30), लिंबू (10 रुपयाला 10 नग), देशी गवारी (60), फ्लॉवर (15/20), दूधी भोपळा (30), ढब्बू मिरची/सिमला मिरची (60), कोबी (20), वांगी (60), शेवगा पेंडी (10/15), आळुची पाने (10 रुपयाला जुडी), आळुचे गड्डे (80), सुरण गड्डा (100), कोथिंबीर (10/20/30/40), पुदीना (5/10 रुपये पेंडी), कडीपत्ता (पाच/10 रुपये पेंडी), लाल बीट (पाच/10 रुपये नग), मुळा (10 रुपये दोन नग), हिरवी चवळी (80). 

हे पण वाचा -  पडळकर यांचा बोलविता धनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील  - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

धान्य-कडधान्यांचे दर (प्रतिकिलो रुपये) : 
शेंगदाणा (110/120), साबुदाणा (70/75), पोहे (45/48), ज्वारी (शाळू) (30/55), गहू (30/35), साधा तांदूळ (30), बासमती (40/75), रत्नागिरी-24 (45), एचएमटी तांदूळ (40/45), तूरडाळ (88/95), हरबरा डाळ (65/70), मूगडाळ (120/125), मूग (115/120), जवारी मटकी (130), मसूर साधी (80), जवारी मसूर (140), उडीद डाळ (110/120), छोले (90/100), जवारी चवळी (85/100), वरणा पावटा (100), कुळीथ (50), सोयाबीन (45/50). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate increase for Carla