विना नंबरप्लेट वाल्यांना दणका  

Recovery of fines from who do not have number plates in ichalkaranji
Recovery of fines from who do not have number plates in ichalkaranji

इचलकरंजी : शहरातील वाढत्या घरफोडी, लुटमारीच्या घटनांबाबत पोलिस प्रशासन गंभीर झाले आहे. गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींनी विना नंबरप्लेट वाहने वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहतूक शाखेने जोरदार ड्राइव्ह सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत दोन दिवसात तब्बल 56 विना नंबरप्लेट वाहने ताब्यात घेऊन 11 हजार 600 रूपये दंडात्मक कारवाई केली आहे. वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, जबर चोरी, तोतयीगिरी करून लुटमार अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींचा शोध घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. गुन्हेगारांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये विना नंबरप्लेट वाहनांचा वापर केल्याचे सीसीटिव्हीद्वारे स्पष्ट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी वाहतूक शाखेला विना नंबरप्लेट वाहनावर कारवाई करून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे वाहतूक शाखा दोन दिवसांपासून सतर्क झाली आहे. विना नंबरप्लेट फिरणाऱ्या प्रत्येक वाहन ताब्यात घेतले जात आहे. प्रत्येक वाहनाची चौकशी सुरू आहे. प्रसंगी दंड आकारला जात आहे. वाहनाचा परवाना, इन्शुरन्स पावती, आधारकार्ड, वाहन मालक आदींची कडक तपासणी करून कारवाईचे सत्र सुरूच आहे. 

शहराला जोडणारे मार्ग, प्रमुख चौक, वर्दळीचे भाग अशा ठिकाणी विना नंबरप्लेट वाहनाविरोधी ड्राईव्ह राबविला जात आहे. दोन दिवसांपासून अशा पध्दतीचा ड्राइव्ह सुरू झाल्याने विना नंबरप्लेट वाहन घेऊन वावरण्यास वाहनधारकांना मुश्‍किल झाले आहे. मोठ्या प्रमाणात वाहनावर कारवाई सुरू असल्याने वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर वाहने सोडण्यासाठी वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे. मात्र वाहनांची कागदपत्रे स्पष्ट असणाऱ्या वाहनांना दंडात्मक कारवाई करून सोडले जात आहे. 
 
नंबरप्लेट लावूनच वाहने ताब्यात 
विना नंबरप्लेट वाहनावर कारवाई आणि कडक तपासणी केल्यानंतर वाहने ताब्यात मिळत असली तरी नंबरप्लेटची सक्ती केली आहे. वाहनधारकांना वाहतूक पोलिसांसमोर वाहनास नंबरप्लेट लावण्याच्या सुचना केल्या जात आहेत. त्यामुळे फक्त तपासणी व दंडात्मक कारवाई करून देखील नंबरप्लेट लावूनच वाहने ताब्यात मिळत आहेत. 

हे पण वाचा - पोटचा मुलगा शहीद झाला ; तब्बल १२ वर्षे मातेची परवड  
 
ई-चलनद्वारे कडक तपासणी 
ई चलन मशिनद्वारे कारवाई करताना विना नंबरप्लेट वाहनांची कडक तपासणी होत आहे. अन्य गुन्ह्यात जर वाहनांचा वापर केला असेल तर त्वरीत ई चलनद्वारे समजते. राज्यातील कोणत्याही भागातील गंभीर गुन्ह्यातील वाहने यामुळे जाळ्यात सापडणार आहेत. अशा अनुषंगानेही विना नंबरप्लेट वाहनांची ई चलनद्वारे तपासणी केली जात आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com