आजऱ्यातील 22 गावात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण 

Reservation For General Category In 22 Villages Of Ajara Kolhapur Marathi News
Reservation For General Category In 22 Villages Of Ajara Kolhapur Marathi News

आजरा : 25 वर्षांच्या आरक्षणाचा विचार करून 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी तालुक्‍यातील 73 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत येथील मध्यवर्ती शासकीय कार्यालयात काढण्यात आली. प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विकास अहिर व निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांनी आरक्षण सोडत काढली. यामध्ये 37 ठिकाणी महिला राज येणार असून 22 ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण आले आहे. 

सुरवातीला अनुसूचित जातीसाठीचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लोकसंख्येनुसार तालुक्‍याकरीता आठ जागांवरती अनुसूचित जातीकरीता आरक्षण काढण्यात आले. यापैकी पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी काढण्यात आले. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीच्या 20 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. यापैकी चक्राकार क्रमानुसार महिलासाठी 23 जागा येऊ शकतात.

तेथे दहा चिठ्ठ्या काढण्यात आल्या. चक्रानुक्रमे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा जागा येत होत्या. त्यामध्ये दहा चिठ्ठ्या काढल्या. उर्वरित 21 चिठ्ठ्या सर्वसाधारण प्रवर्गातील शिल्लक आरक्षणाकरीत घेतल्या. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 23 तर, सर्वसाधारण 22 जागाकरीता आरक्षण निश्‍चित झाले. सभापती उदयराज पवार, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, सुधीर देसाई, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार, माजी सभापती मसणू सुतार, राजू होलम, शंकर कुराडे, विजय केसरकर यासह पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य शेलार, वेंदात म्हसवेकर, गौरव प्रभू, शार्दुल कविटकर या बालकांनी चिठ्ठ्या काढल्या. 

गाववार आरक्षण असे 
- अनुसूचित जाती - गजरगाव, सुळेरान, चिमणे, बेलेवाडीहू 
- अनुसूचित जाती महिला - धामणे, सरंबळवाडी, इटे, वडकशिवाले 
- नागरिकांचा मागास प्रवर्ग-चाफवडे, उत्तूर, सिरसंगी, शेळप, हालेवाडी, झुलपेवाडी, लाटगाव, मसोली, आवंडी, कोरिवडे 
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - सोहाळे, वझरे, कासारकांडगाव, चव्हाणवाडी, किणे, जाधेवाडी, मलिग्रे, पोळगाव, बुरुडे, हात्तीवडे. 
- सर्वसाधारण - मुरुडे, हाजगोळी खुर्द, दाभिल, देवकांडगाव, देवर्डे, वेळवट्टी, साळगाव, हरपवडे, वाटंगी, श्रृंगारवाडी, सरोळी, कर्पेवाडी दु, मासेवाडी, कोवाडे, मेंढोली, सुलगाव, भादवणवाडी, खेडे, किटवडे, मडिलगे, निंगुडगे, पेद्रवाडी. 
- सर्वसाधारण महिला-चांदेवाडी, एरंडोळ, गवसे, कानोली, लाकुडवाडी, सुळे, खोराटवाडी, होन्याळी, पारपोली, आरदाळ, हाजगोळी बुद्रुक, भादवण, बहिरेवाडी, खानापूर, पेंढारवाडी, हाळोली, चितळे, महागोंड, कोळिंद्रे, देऊळवाडी, पेरणोली, होनेवाडी, मुमेवाडी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com