अपक्षांना येणार चांगले दिवस ; सरपंच पदाची लागणार लाॅटरी 

सुनील पाटील 
Monday, 25 January 2021

जिल्ह्यातील 433 पैकी 47 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली.

कोल्हापूर : जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी (ता. 27) जाहीर केले जाणार आहे. ज्या गावात दोन्ही गटांचे उमदेवार समान विजयी झाले आहेत. अशा ठिकाणी अपक्ष निवडूण आलेल्या उमदेवारांची भूमिका गावात आरक्षण कोणते जाहीर होणार यावर अवलंबून आहे. जो अपक्ष उमेदवाराचा फायदा करेल त्या पार्टीच्या किंवा गटाच्या मागे जावू शकतो, अशी परिस्थिती आहे. 

जिल्ह्यातील 433 पैकी 47 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित 386 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने आणि इर्षेने मतदान झाले. निकालही तसाच जाहीर झाला. यामध्ये दोन पार्ट्या किंवा गट असणाऱ्या गावात अपक्षाला खूप महत्व आले आहे. अपक्षा ज्या ठिकाणी जाईल, त्या पार्टीची सत्ता येईल, अशी परिस्थिती आहे. तसेच काही काही ठिकाणी अपक्षांना बाजुला ठेवून दोन्ही पार्ट्यांमध्ये समान पदे वाटून घेवून हा वादच संपवला आहे. सध्या तरी अनेक गावात अपक्षांची भूमिका महत्वाची ठरत आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या आरक्षणामध्ये जो अपक्ष आहे. त्याच बाजूचे किंवा प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाल्यास त्याला सरपंच पदाचे मोठी संधी मिळू शकणार आहे. त्यामुळे ग्रामपंचातयतीमध्ये समान सदस्य असणारे दोन्ही बाजूचे गट अपक्षाला गृहित धरुनच सत्तेचे नियोजन करत आहेत. पण प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर अपक्षांच्या मनातील नियोजन या दोन्ही गटांसमोर येवू शकते. दरम्यान, काही-काही गावात अपक्षांना विचारात न घेता दोन्ही गट एकत्र येवून सत्ता स्थापन करण्याच्या पवित्र्यात आहेत. गाव म्हणून विचार करुन गावचा विकास साध्य करावा, या हेतूने हे नियोजन होत असल्याचे चित्र आहे. 

हे पण वाचा मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

नेत्यांच्या जोडण्या  
आपल्याच पार्टीची सत्ता स्थापन करण्यासाठी गावकारभाऱ्यांच्या आतापासूनच जोडण्या सुरु झाल्या आहेत. कोण आपल्या गटात येतो. कोणाला सांगितल्यावर कोण ऐकेल, अशा जोडण्या जिल्ह्यात दिसत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reservation of sarpanch post kolhapur district