लालपरीच्या 'या' अभिनव उपक्रमातून तब्बल एवढ्या लाखांचे उत्पन्न 

शामराव गावडे
Tuesday, 15 September 2020

कंडिशन गाड्यांची बाकडी काढून त्या मालवाहतूक बस गाड्या बनविल्या.

नवेखेड : एसटीच्या सांगली विभागाला मालवाहतूकीतून तब्बल २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. विभागाने ५४० फेऱ्यांद्वारे गेल्या तीन महिन्यात हे उत्पन्न मिळविले आहे. 

23 मार्च पासून जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीमुळे  प्रवासी वाहतूक बंद झाली. त्यामुळे एसटीचे उत्पन्न थांबले. मागील दोन महिन्यात काही मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्याला तशी प्रवासी गर्दी कमी आहे. महामंडळाने इतर बाबींमधून उत्पन्न मिळावे यासाठी  मालवाहतूक गाड्यांची सोय केली. 

कंडिशन गाड्यांची बाकडी काढून त्या मालवाहतूक बस गाड्या बनविल्या. या वाहतुकीचे प्रतिटन दर मर्यादित ठेवल्याने मोठ्या प्रमाणात या वाहतुकीसाठी प्रतिसाद मिळाला. या गाड्यांचा मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला. सांगली विभागाने अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मुंबई , पुणे या विभागांमध्ये २० मालवाहतूक बस गाड्यांमधू ५४० फेऱ्या करीत जवळपास २५ लाखांचे  उत्पन्न मिळवले. लांब पल्ल्याची मालवाहतूक असेल तर त्याठिकाणी दोन चालकांची सोय करून कामगिरी निभावली. पहिल्यांदा सुरू केलेल्या एसटी बस मालवाहतूकिला व्यापारी दुकानदार यांचा  चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीनंतर तर जनजीवन सुरळीत होईल, त्यावेळी आणखी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. 
या मालवाहतूक गाड्यांवर कामगिरी करणाऱ्या चालकांना जेवण भत्ता मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

हे पण वाचा -  7899 हाच नंबर ठरला ॲड. शिंदे यांच्यासाठी विजयाची निशाणी  

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. इच्छित स्थळी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा माला सुरक्षितपणे आम्ही पोहोच केला.
-विक्रम हांडे, वाहतूक अधीक्षक सांगली

 एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसचा आम्हाला चांगला फायदा झाला. आमची खते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू शकली. 

-सतीश पाटील 

हे पण वाचाइंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue of Rs 25 lakhs from freight to Sangli division of ST