वाढता रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टी आहेत महत्वाच्या

Rising blood pressure can be controlled in time health marathi news
Rising blood pressure can be controlled in time health marathi news

कोल्हापूर : महिलांमधील वाढता रक्तदाब चिंतेचा असला तरी यातील बहुतांशी रक्तदाब वेळीच तपासणी, खबरदारीतून तो नियंत्रणात आणता येणेही शक्‍य आहे. त्यासाठी रक्तदाबाचे स्वरूप लक्षणे समजून घेणे व धोका टाळण्यासाठी व्यसनापासून दूर राहणे जीवनशैलीत गरजेनुसार बदल करणे त्यासाठी तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घेणे याविषयी जागृती महत्त्वाची आहे, असे मत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी व्यक्त केले.


दुरुस्त होणारा रक्तदाब
अतिलठ्ठपणा, कौटुंबीक ताण, अनियमित, अपूर्ण झोप, तंबाखू मिशीर लावणे, धुम्रपान मद्यपान टाळणे, तपासणी निदान व उपचार घेतल्यास रक्तदाब नियंत्रणाची शक्‍यता.
दुरुस्त न होणारा रक्तदाबवाढते वय, लिंग, रजोनिवृत्ती, अनुवंशंकतेतून येणारा रक्तदाब नियंत्रणात आणणे अवघड होते.


नियमित रक्तदाब  
१२० वर,  ८० खाली
पूर्व उच्च रक्तदाब  
१२१ ते १३९ आणि ८० ते ८९ 
वेळीच निदान आवश्‍यक.  
सौम्य रक्तदाब (स्टेज एक)
१४० ते १५९ आणि ९०  ते ९९ 
सौम्य रक्तदाब (स्टेज दोन)
१६० ते १७९ आणि १०० ते १०९ 
अतिउच्च रक्तदाब...
१८० ते कितीही आणि ११० ते कितीही
(उत्तरार्ध)

महिलांत रक्तदाब वाढण्याची कारणे 
अ) वेळीच तपासणीला जाणे व निदान करून घेणे टाळणे.
ब) औषधे मध्येच बंद करणे किंवा न घेणे. 
क)बदलती जीवनशैली ः फास्ट फूड, अति मांसाहार, व्यसन करणे.     
ड) अनियमित किंवा अपूर्ण झोप (व्यक्तीगत आरोग्याकडे दुर्लक्ष)

रक्तदाबवाढीची कारणे
 ९० ते ९५ टक्के महिलांत कारणाशिवाय रक्तदाब वाढतो
 ५ ते १० टक्के महिलांना किडणी विकार, धमन्या, थायरॉईड, मधुमेह,  लठ्ठपणाचे विकारातून रक्तदाब वाढतो.
उपाय योजना अशा ः 
 वेळीच तपासणी, व उपचार घेणे
 कोणतेही लक्षणे अंगावर काढणे टाळावे 
जीवनशैलीत बदल आवश्‍यक  
 रोज ४० मिनिटांचा व्यायाम 
 १० मिनिटे ध्यान, वजन कमी करणे
 आहार : मीठ विरहित पदार्थ खा, अति मीठ टाळा, दिवसाला २.५ ग्रॅम         पेक्षा कमी मीठ घ्यावे 

महिलांमधील वयानुसार वाढता रक्तदाब
वय    राज्य प्रमाण    कोल्हापूर प्रमाण टक्‍क्‍यात
१८ ते २९    १.१    २.१३ 
३० ते ३९    ३.०३    ३.६० 
४० ते ४९    ७.६६    ८.१८  
५० ते ५९    ३२. ३२    ३३.१  
६० ते ६९    ३५    ४२ 
७० च्यावर    ४१.१५    ४२ 

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com