खेळायचे असेल तर आधी परीक्षा द्या !

Rules specifically for rugby players More than 100 players from Kolhapur are preparing for this exam
Rules specifically for rugby players More than 100 players from Kolhapur are preparing for this exam

कोल्हापूर : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडा जगतावर परिणाम झाला आहे. बंद असणाऱ्या स्पर्धा आणि सराव सध्या काही प्रमाणात सुरू होत आहेत; मात्र मैदानावर जाताना खेळाडूंनी काळजी घेणे गरजेचे असल्याने जागतिक रग्बी संघटनेने प्रत्येक खेळाडूला कोरोनाची परीक्षा देण्याचे अनिवार्य केले आहे. यासाठी कोल्हापूरच्या १०० हून अधिक खेळाडू या परीक्षेची तयारी करत आहेत.
 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रग्बी संघटनेने सर्व रग्बी खेळाडूंना संसर्गजन्य रोगापासून काळजी घेण्यासाठी खास रग्बी खेळाडूंसाठी नियमावली तयार केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी वेबसाईटवर सर्व खेळाडूंना ऑनलाईन परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. या महामारीपासून संरक्षण कसे करता येईल, याच्याविषयी अभ्यास व काही तांत्रिक गोष्टी यात नमूद केल्या आहेत. प्रत्येक रग्बी खेळाडूस या गोष्टी समजण्यासाठी ही ऑनलाईन परीक्षा अनिवार्य केली आहे. 


यासाठी रग्बी इंडिया यांनी राज्य संघटनांना तशा सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रग्बी असोसिएशन यांनी सर्व जिल्हा संघटनांना जागतिक संघटनेच या सूचनांचे पालन करण्याचे बंधनकारक केले आहे. कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनतर्फे जिल्ह्यातील सर्व रग्बी खेळाडूंना हा कोर्स पूर्ण करणे खेळाडूंना बंधनकारक केले आहे. अन्यथा कोणत्याही खेळाडूस व प्रशिक्षकास कोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत खेळात येणार नाही. शिवाय त्याची मान्यताही दिली जाणार नाही आहे.  जिल्ह्यातील ३० पेक्षा जास्त खेळाडूंनी ही जागतिक पातळीवरील परीक्षा पूर्ण केली आहे. 

अशी असेल परीक्षा
  ही परीक्षा सराव आणि स्पर्धा दोन्हीत सहभागासाठी आवश्‍यक
  सर्व प्रश्नाची बरोबर उत्तरे देणे आवश्‍यक.
  खेळातील नियमांच्या पालनाबरोबरच सोशल डिस्टंसिंग नियमाचा अवलंब करण्याचे संकेत
  कोविड लक्षणे आणि उपाययोजना याचे प्रश्न
  सरावा दरम्यान संपर्क टाळण्याच्या सक्त सूचना
  खेळण्यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य


पहिली खेळ संघटना 
इतक्‍या मोठ्या पातळीवर प्रत्येक खेळाडूसाठी परीक्षा अनिवार्य करणारी रग्बी ही पहिली संघटना ठरली आहे. जागतिकस्तरावर खेळल्या जाणाऱ्या या खेळात थेट संपर्क येतो, याचा विचार करूनच प्रत्येक खेळाडूला कोविडबाबत माहिती आणि जागरूकता येणे हे गरजेचे आहे.

या परीक्षेने खेळाडूंमध्ये कोविडबाबत जागृती निर्माण होणार असल्यामुळे याचा फायदा त्यांना प्रत्यक्ष मैदानावर होणार आहे. संसर्ग टाळायचा असेल तर इत्थंभूत माहिती गरजेची असते.
- प्रा. अमर सासने, अध्यक्ष, जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com