सोमवारपासून कोल्हापुरात लाॅकडाऊनची अफवाच..वाचा सविस्तर

Rumors of lockdown in Kolhapur from Monday say collector daulat desai
Rumors of lockdown in Kolhapur from Monday say collector daulat desai
Updated on

कोल्हापूर - राज्य शासनाच्या निर्णयानूसारच लॉकडाऊनचे निर्णय घेतले जात आहेत. कोल्हापूरसाठी वेगळे लॉकडाऊन असणार नाही. तसेच, सोमवारपासून कोल्हापूरात कडक लॉकडाऊन होणार, ही अफवा असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सांगितले. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवता आपले व्यवहार सर्व नियम आणि अटी पाळत सुरु ठेवावेत असेही आवाहन देसाई यांनी केले आहे. 

आज(ता. १२) सकाळपासून समाजमाध्यमावर सोमवारपासून कोल्हापुरात कडक लाॅकडाऊन होणार, असे मेसेज फिरत आहेत. या मेसेजमुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्व सुरळीत सुरू असताना सोमवारपासून लाॅकडाऊन कडक होणार असे मेसेज फिरल्याने लोक गोंधळून गेले. त्यामुळे जिल्हाधिकारी देसाई यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. 

याबात बोलताना देसाई म्हणाले, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जो निर्णय सरकार घेते त्याचेचे अनुकरण कोल्हापूरात केले जात आहे. दरम्यान, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सोशल मिडियावरून फिरत असलेल्या लॉकडाऊनच्या बातम्या चुकीच्या आणि निराधार आहेत. असे लॉक डाऊनबाबत आपण कोणतीही सूचना दिलेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जावू नये. पण सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचेही श्री देसाई यांनी सांगितले. दरम्यान, सोशल मिडियावरून व्हायरल होणाऱ्या बातम्यांबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचा खरी माहिती स्पष्ट केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com