Sakal Impact : 'इचलकरंजीत डॉक्टर अखेर नरमले'....

sakal news impact Ichalkaranjit doctor finally softened kolhapur marathi news
sakal news impact Ichalkaranjit doctor finally softened kolhapur marathi news
Updated on

 इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरजू रुग्णांवर उपाचाराबाबत प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर शहरातील खासगी डॉक्टरमंडळी नरमली आहेत. आयजीएम रुग्णालयाकडून शिफारस केलेल्या गरजू रुग्णांवर रोटेशन पध्दतीने मोफत तपासणी व शस्त्रक्रीया करण्याची तयारी आज दर्शवली. यामुळे शहरातील रुग्णांची हेळसांड थांबण्यास मदत होणार आहे. याबाबत मंत्रालय पातळीपर्यंत तक्रार झाल्याने हा प्रश्‍न चर्चेत आला होता.


कोरोना काळात सर्व खासगी रुग्णालये सुुरु ठेवण्याचे शासनाने आदेश आहेत. पण कांही रुग्णालये बंद ठेवण्यात आल्यामुळे किरकोळ आजार असणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत. तर आयजीएम रुग्णालयाकडे उपचार घेणार्‍या रुग्णांना अन्य खासगी रुग्णालयात उपचार करण्यास अडचणी येत आहेत. यातून होणार्‍या रुग्णांच्या हेळसांडीबाबत मंत्रालय पातळीपर्यंत तक्रारी दाखल झाल्या. त्याची गंभीरतेने दखल घेतल्यांने प्रशासनाने आज कठोर भूमिका घेतली.

इचलकरंजीत शिफारस केलेल्या रुग्णावर मोफत उपचार करणार

प्रशासनाकडून कारवाईचा इशारा दिल्यानंतर खासगी डॉक्टरांनी आयजीएम रुग्णालयात येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यास तयारी दर्शवली आहे. खासगी डॉक्टर व प्रशासन यांच्यात झालेल्या करारानुसार आयजीएम रुग्णालयात येणार्‍या गरजू रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. विशेष करुन सिझेरियन शस्त्रक्रीयेसाठी आवश्यक औषध किट आयजीएम रुग्णालयाकडून पुरविण्यात येणार आहे. रोटेशन पध्दतीने या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांची होणारी परवड थांबण्यास मदत होणार आहे.

आयजीएम रुग्णालयाचा संदर्भ महत्वाचा

थेट खासगी रुग्णालयात जाणार्‍या रुग्णांवर मात्र मोफत उपचार होणार नाहीत. आयजीएम रुग्णालयात येणार्‍या गरजू रुग्णांवरच खासगी रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. मात्र त्यासाठी आयजीएम रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिक्षकांचे संदर्भ पत्र सोबत असणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचे पत्र मात्र ग्राह्य धरले जाणार नाही.
 

प्रांताधिकार्‍यांनी केली रुग्णालयांची तपासणी

कोरोनाच्या धास्तीने अनेक खासगी डॉक्टरांनी आपली रुग्णालये बंद ठेवली आहेत. याबाबत तक्रारी आल्यामुळे आज प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांनी राजर्षी शाहू पुतळा परिसरातील नऊ रुग्णालयांची अचानकपणे तपासणी केली. यामध्ये एक दंतरोग तज्ञाचा दवाखाना बंद आढळून आला. तर उर्वरीत रुग्णालये सुरु होती. रुग्णांचीही वर्दळ सुरु असल्याचे त्यांना दिसून आले. मात्र यातील एका रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणतीच खबरदारी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब दिसून आली.

रुग्णांनी सोशल डिस्टन्सींग पाळले नव्हते. तसेच सॅनिटायझरची सुविधा नसल्याचेही या ठिकाणी दिसून आले. याबाबत संबंधित डॉक्टरांना नोटीस देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी खरात यांनी पत्रकारांना सांगितले. यापुढेली कांही खासगी रुग्णालयात अचानक भेट देवून पाहणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com