एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही "सकाळ'च्या या प्रयत्नाचे जोरदार स्वागत झाले

कोल्हापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने आज प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणाच्या विशेष अंकाचे सर्वच घटकांनी आज जोरदार स्वागत केले. "एकच चर्चा, हवा कोल्हापूरची' असेच चित्र सकाळी शहरात अनुभवायला मिळाले. सर्वेक्षणातून विचारण्यात आलेले प्रश्‍न, त्यांच्या निष्कर्षाची मांडणी, प्रमुख नेत्यांच्या मुलाखती असतील किंवा फ्रेंच विंडो पद्धतीची छपाई या सर्वच गोष्टी वाचकांना चांगल्याच भावल्या. साहजिकच शहरातील जुन्या पेठांबरोबरच उपनगरातील तालीम संस्था आणि तरुण मंडळांनी हा अंकच वार्ता फलकावर लावला. तेथेही सर्वेक्षण वाचण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही "सकाळ'च्या या प्रयत्नाचे जोरदार स्वागत झाले. 

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ, महाराष्ट्र सेवा मंडळ, वेताळ तालीम, शिवाजी फ्रेंडस्‌ सर्कल, नेताजी तरुण मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळ, सुबराव गवळी- प्रॅक्‍टिस क्‍लब, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, तुकाराम माळी तालीम मंडळ, राधाकृष्ण भक्त मंडळ, गंगावेश चौकातील गंगावेश तालीम, ऋणमुक्तेश्‍वर तालीम, नागराज रिक्षा मित्र मंडळ, जुना बुधवार पेठेतील राजगुरू तरुण मंडळासह कसबा बावड्यातील भारतवीर मित्र मंडळ, छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ, सानेगुरुजी सांस्कृतिक मंडळ, न्यू स्टार मंडळ, हिंदू युवा प्रतिष्ठान, म्हसोबा देवालय फ्रेंडस्‌ सर्कल, रॅश ग्रुप, जय पद्मावती मंडळ, गुडलक तरुण मंडळ, जय हिंद ग्रुप, रंकाळवेश तालीम मंडळ आदी तालीम व मंडळांच्या वार्ता फलकांवर "सकाळ'चे अंक झळकले. 

 हे पण वाचा धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

मॉर्निंग वॉकर्समध्येही चर्चा 
रंकाळा, क्रीडा संकुल, शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव, दुधाळीबरोबरच शहरातील विविध ठिकाणी सकाळी फिरायला येणाऱ्या मॉर्निंग वॉकर्स ग्रुपमध्येही "सकाळ'च्या या सर्वेक्षणाची जोरदार चर्चा झाली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal survey welcomed through social media