तर...सरकारला लाज वाटली पाहिजे

samarjeet ghatge criticism on maharashtra government
samarjeet ghatge criticism on maharashtra government
Updated on: 

 कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाला 48 तासात स्थगिती दिली. हे निर्णय रद्द करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढले. थेट सरपंच निवड असो, महानगरपालिकेची वॉर्ड रचना असो, बाजार समिती समितीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीने तातडीने अध्यादेश काढले आहे. मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याचा अध्यादेश काढण्यासाठी वेळ लागला नाही. मग, शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफीचा देण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी वेळ केला जातो, याची सरकारला लाज वाटली पाहिजे? असा टोला भाजपच ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज येथे केला. 

श्री घाटगे यांच्या नेतृत्वाखाली "सरसकट कर्जमाफी' साठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. 

घाटगे म्हणाले, "" शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची घोषणा केली. पण, कर्जमाफीसोबत दिलेल्या नियम आणि अटीमुळे राज्यातील 95 टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. दोन लाखापर्यंतचे पिककर्ज माफ केले. पण, ज्या लोकांनी नियमित कर्ज परतफेड केली. त्यांना यापासून वंचीत ठेवले. त्या शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला. वास्तविक प्रामाणिक शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी मिळालीची पाहिजे, अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे. 

ज्या साखर कारखाने, बॅंक, सहकारी सेवा संस्थांमध्ये 25 हजार पगार आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. संचालक मंडळांना, मायक्रो फायनांन्सकडून कर्ज घेतले आहे. त्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही. भूविकास बॅंकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले, तेही कर्जमाफ झाले पाहिजे. 

शेतकऱ्यांच्या "लाईट'चे काय? 
मुंबईमध्ये नाईट लाईफचा विचार करता हे चांगले आहे. मात्र, शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट मिळत नाही, याचा विचार का करत नाही. मुंबईतील नाईट लाईफचा विचार करणारे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार की नाही, असा सवालही श्री घाटगे यांनी केला. 

सरकारला स्वस्थ बसू देणार नाही
पालकमंत्री सतेज पाटील यांचे दूरध्वनीवरून माझ्याशी बोलणे झाले. तसेच, त्यांनी भेटण्यासाठी निमंत्रणही दिले. यावेळी, आम्ही शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफीचा अध्यादेश काढा, अशी मागणी केली. मात्र, ते तात्काळ अद्यादेश काढू शकले नाहीत. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा काढला आहे. आमच्या मागण्यांचा अध्यादेश काढाला असता तर, जाहीर केलेले आंदोलन मागे घेतले असते. पण काही लोकांनी टिका केली. पण जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत त्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असे घाटगे यांनी सांगितले. 

मंत्रालयासमोर आंदोलन करू
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट, नियम अटींशिवाय कर्जमाफी जाहीर करावी. सरकारने या आंदोलनाचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा नाहीतर मंत्रालयासमोर आंदोलन करून सरकारला जाब विचारू, असा इशाराही श्री घाटगे यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com