आता कोल्हापूर -गोवा फक्त दोन तासांत

Sankeshwar Banda four lane highway declared then Will reach Goa in two hours
Sankeshwar Banda four lane highway declared then Will reach Goa in two hours
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्यात दोन आणि गडहिंग्लजमधून दीड तासांत पोचता येणार आहे. संकेश्‍वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यावर एन एच ५४८ म्हणून शिक्कामोर्तब झाला आहे. ६० मीटर रुंदीचा हा महामार्ग अपेक्षित आहे. महामार्ग झाल्यास कोल्हापूर जिल्हा कोकण आणि गोव्याच्या आणखी जवळ येणार आहे. यातून व्यापार, पर्यटन वाढणार आहे. साधारण ३१ मार्चपर्यंत याचा निधी केंद्र शासनाकडून येणार असून दोन-अडीच वर्षात हे काम पूर्ण होईल, असे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून झाले आहे.


संकेश्‍वर ते बांदा हा महामार्ग होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र रेड्डी पोर्ट (जि. सिंधुदुर्ग) जोडण्यासाठी हा मार्ग पुढे आला. त्यातून हा मार्ग प्राधान्यक्रमांत आला. भारतमाला आणि सागरीमाला या केंद्र शासनाच्या दोन्ही योजनांमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्यामुळे त्याचे काम तातडीने सुरू झाले. या संपूर्ण मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्याला एन.एच.५४८ क्रमांकही दिला. त्याचा प्रस्ताव पुढील महिन्यात पुण्यातून दिल्लीत जाणार आहे. ३१ मार्चमध्ये निधी मंजूर होणार आहे. हा महामार्ग चार पदरी असणार आहे. या मार्गावरील गती ही ताशी शंभर किलोमीटर असणार आहे. महामार्गाची लांबी १०८ किलोमीटर असणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज मधून केवळ तासांत गोव्यात पोचणार आहे आंबोली घाटामुळे आणखी वीस-तीस मिनिटांचा जादा कालावधी गृहीत धरला तर दीड तासांत बांद्यामध्ये पोचता येणार आहे.


तीनेक वर्षात काम पूर्ण
संकेश्‍वर- गडहिंग्लज- कोवाडे- आजरा- गवसे- आंबोली- केगड- सावंतवाडी- बांदा असा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ असणार आहे. हा महामार्ग संकेश्‍वरपूर्वी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार (ऐशियन हायवे ४७) पासून सुरू होणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com