"सार्थिका'मुळे वडिलांच्या घामाचे सार्थक; परिस्थितीच्या जाणिवेतून फुलली गुणवत्ता 

Sarthika Suryavanshi Achieved 97.40 Percent Marks In 10th Kolhapur Marathi News
Sarthika Suryavanshi Achieved 97.40 Percent Marks In 10th Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : आई-वडिलांच्या कष्टाच्या घामाला खरा सुगंध येतो तो पाल्यांच्या यशामुळे. परिस्थितीची जाणीव ठेवून फुललेली गुणवत्ता नेहमीच अखेरपर्यंत टिकते. येथील हाळलक्ष्मी नगरमधील सायकल व दुचाकी पंक्‍चर काढण्याचे दुकान असलेल्या सदानंद सूर्यवंशी यांच्या सार्थिका या मुलीने दहावीत 97. 40 टक्के गुण मिळवून आपल्या वडिलांच्या घामाचे चीज केले आहे. जागृती प्रशालेत पहिल्या क्रमांकासह उत्तीर्ण झालेल्या सार्थिकाच्या या यशाने आई-वडिलांच्या घामाला खरा सुगंध आला आहे. 

सूर्यवंशी कुटुंबीय 35 वर्षांपासून गडहिंग्लजला वडरगे रोडवरील हाळलक्ष्मी नगरमध्ये वास्तव्यास आहे. घरची अल्प शेती आणि प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने पदवीधारक सदानंद यांनी याच भागात छोटेसे किराणा दुकान घातले. व्यवसायातील प्रचंड स्पर्धेमुळे दुकानातून समाधानकारक उत्पन्न हाती येत नाही. यामुळे किराणाला जोड धंदा म्हणून सायकल आणि दुचाकी पंक्‍चरचा व्यवसाय सुरू केला. एकीकडे हा खटाटोप आणि दुसऱ्या बाजूला कधी-कधी बदली ड्रायव्हर म्हणूनही सदानंद कामाला जातात. सार्थिकाची आई गृहिणी असून तिचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. 

या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवूनच सार्थिकाने सुरूवातीपासून अभ्यासात मन लावले. कोणतेही ट्युशन लावले नाही. त्यासाठी परिस्थितीही नव्हती. केवळ स्वकर्तुतत्वावर आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास सुरू ठेवला. जिद्द आणि कष्ट या दुहेरी संगमातून तिने दहावीच्या परीक्षेत मिळवलेले यश इतरांना आदर्शवत असे आहे.

परिस्थितीची जाणीव असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण सार्थिकाने या यशाद्वारे घालून दिले आहे. घरातील अल्प शैक्षणिक पार्श्‍वभूमी, कोणतेही क्‍लासेस न लावता सार्थिकाने स्वबळावर आणि शाळेतील शिक्षकांनी केलेल्या अध्यापनाच्या आधारे जागृती प्रशालेत पहिल्या क्रमांकाचा झेंडा लावला. तिचे प्राथमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले आहे. 

"मेडिकल'कडे कल 
बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून आणि त्यापुढे मेडिकल क्षेत्राकडे वळण्याचा मानस सार्थिकाने व्यक्त केला. सुरूवातीपासूनच हुशार असलेल्या सार्थिकाने त्यादृष्टीनेच तयारी सुरू केली आहे. तिच्या अंगी असलेल्या गुणवत्तेला आई-वडिलांनीही पाठबळ देण्याचे ठरविले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com