'आघाडीसाठी मातब्बरांचा त्याग'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

‘खंडेराव जगदाळे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांनी माघार घेतल्याने आसगावकर यांचा विजय निश्‍चित आहे

शिरोळ (कोल्हापूर) - ‘‘राज्यातील परिवर्तनाची सुरवात कोल्हापूर जिल्ह्यातून होते. या निवडणुकीत मातब्बरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी त्याग केला. यामुळे गाफिल न राहता शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या,’’ असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. प्रा. आसगावकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. येथील समर्थ मंगल कार्यालयात मेळावा झाला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘खंडेराव जगदाळे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांनी माघार घेतल्याने आसगावकर यांचा विजय निश्‍चित आहे.’’

माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  गणपतराव पाटील, मुरलीधर जाधव, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जयराम बापू पाटील, सर्जेराव शिंदे, मीनाज जमादार, रोहिणी निर्मळे, डी. टी. कदम उपस्थित होते.

चंदगडमध्ये मेळावा
चंदगड : अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा येथे मेळावा झाला. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. आर. पी. पाटील, विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, विद्याधर गुरबे यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्षा प्राची काणेकर, संज्योती मळवीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, संगीता पाटील उपस्थित होते. शिवानंद हुंबरवाडी यांनी स्वागत केले. एम. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

हे पण वाचा - पैलवान ते मगरींचा वस्ताद ; महाराष्ट्राचा क्रॉकोडाईल मॅन रामदास

पाचही जागा जिंकणार ः पाटील
गडहिंग्लज : विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. प्रकाश लाड, ए. वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satej patil speech in kolhapur shirol