आता स्कूल बसच्या फिटनेसची होणार तपासणी ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आरटीओकडून पुढाकार

राजेश मोरे
Wednesday, 20 January 2021

शाळा सुरू होण्याच्या हालचालीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व स्कूल बसच्या फिटनेसह कागदपत्रांची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मार्फत हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू होण्याच्या हालचालीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

कोरोना संकटामुळे तब्बल १० ते ११ महिने शाळा बंद होत्या. परिणामी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसही जागेवर थांबून होत्या. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे. शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशानाच्या आदेशानंतरच स्कूल बसही रस्त्यावर दिसू लागतील. घर ते शाळा व शाळा ते घर असा विद्यार्थ्यांचा सुरक्षीत प्रवास व्हावा. याकरिता जिल्ह्यातील अनेक शाळांतून स्कूल बसची सुविधा आहे.

हेही वाचा -  ग्रामपंचायत सदस्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन सुरू

प्रशानाने घालून दिलेल्या नियमावलीचा आधार घेत या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. आरटीओ कार्यालयाकडून दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात स्कूल बसच्या फिटनेची तपासणी मोफत केली जाते. त्यासाठी वारंवार आवाहनही केले जाते, पण गेल्या अनेक महिन्यांपासून या स्कूल बस बंद असल्याने या बसचा सध्याचा फिटनेस कसा आहे, बसचे वेळेत पासिंग केले गेले की नाही? बसचा विमा, शासकीय करांची पूर्तता केली आहे की नाही? याबाबतची कागदपत्रे तपासणी केली जाणार आहे. आरटीओ कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांनी आपापल्या स्कूलबसचे वेळेत पासिंग करून विमा, करासह आवश्‍यक बाबी वेळेत पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत. अन्यथा संबंधित शाळांच्या स्कूल बसना आरटीओच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी आरटीओ कार्यालयाने उचललेले पाऊल हे पालकांना समाधान देणारे आहे. 

हेही वाचा - १० जानेवारीला दागिने तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम चोख सोने दिले होते 

"स्कूल बसच्या फिटनेसह सर्व कागदपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळेबरोबर पालकांनीही सतर्क राहावे."

- डॉ. स्टिव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

दृिष्टक्षेपात :

 

  •  जिल्ह्यातील सरासरी स्कूल बससंख्या - ७५० 
  •  मोफत तपासणी मोहिमेत सहभागी होणाऱ्या स्कूल बस - ४५०

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school bus checking by RTO office kolhapur for the protection of students in kolhapur