
कोरोनामुळे शाळा उशीरा सुरू झाल्या. एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. काहींचे अभ्यासक्रम बाकी आहेत
कोल्हापूर - कोरोनासंबंधी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या वेळापत्रकात तुर्तास कोणताही बदल होणार नाही. मात्र शिक्षकांनी कोरोनासंबंधी खबरदारी घ्यावी असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे.
जयसिंगपूर येथे एका शाळेत शिक्षिका कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली. शाळा तातडीने सोडण्यास काल परवानगी दिली. तीन दिवस इकडे कोणीही फिरकणार नाही असे आदेश दिल्याचे सांगून लोहार यांनी उपशिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांची याकामी नियुक्ती केल्याचे सांगितले.
हे पण वाचा - गोकुळ च्या 16 हरकतींवरील सुनावणी पूर्ण; उद्या सहा तालुक्यांची सुनावणी
कोरोनामुळे शाळा उशीरा सुरू झाल्या. एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. काहींचे अभ्यासक्रम बाकी आहेत. अशा स्थितीत एक शिक्षिका पॉझिटीव्ह आल्या म्हणून शाळांच्या वेळापत्रकात बदल करणे अथवा निर्बंध लादणे योग्य होणार नाही. काहीजण याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारा हजार शिक्षक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी सध्या जे नियम घालून दिले आहेत त्याची अंमलबजावणी करावी. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत. शाळेच्या वेळापत्रकात मात्र कोणताही बदल होणार नाही.
संपादन - धनाजी सुर्वे