कसं असेल उद्याच चंद्र ग्रहण ? कधी पाहता येईल तुम्हाला ? वाचा....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

. हे चंद्रग्रहण संपुर्ण भारतातून हि दिसणार आहे यामुळे भारतातील खगोल हौशींना हि एक खगोल पर्वणी आहे.

कोल्हापूर - या वर्षातील दुसरे छायाकल्प चंद्र ग्रहण हे दि.  ५ जूनला होणार आहे. कोल्हापुरातून या ग्रहणास दि.५  जूनच्या रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी या ग्रहणास सुरुवात  होऊन ते दि. ६ जूनच्या रात्री पहाटे २ वाजून ३४ मिनिटापर्यंत ग्रहण चालणार आहे. या छायाकल्प चंद्र ग्रहणाचा कालावधी हा ३ तास १८ मिनिटे असून याचा मध्य रात्री १२ वाजुन ५४ मिनिटांनी असेल. छायाकल्प चंद्र ग्रहणाचा मध्याच्या वेळी चंद्र बिंबाची तेजस्विता उणे  ०. ४१ एवढी असेल. हे चंद्रग्रहण संपुर्ण भारतातून हि दिसणार आहे यामुळे भारतातील खगोल हौशींना हि एक खगोल पर्वणी आहे.

ग्रहणाचा मानवी जीवनावर होत नाही परिणाम

भारता व्यतिरिक्त हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण / पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्क्टिका या भागा मधून हे चंद्रग्रहण  दिसणार आहे. चंद्रग्रहण हे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य सरळ रेषेत आल्यावर होत असते ज्यामध्ये पृथ्वीची सावली हि चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण आपणास दिसू लागते. तर छायाकल्प ग्रहणात पृथ्वीची पडछाया चंद्रावर पडणार असून चंद्र पूर्णतः झाकला जाणार नसून पृथ्वीच्या उपछायातून मार्गस्थ होईल. परिणामी तो आपल्याला तांबुस रंगाचा दिसेल. 

वाचा - ई  सकाळ ची बातमी पाहाताच त्या कुटुंबांना मिळाला फेसबुक मंडळींचा मदतीचा हात...

या वेळी पौर्णिमेच्या चंद्राची ग्रहकालावधीत तेजस्विता उणे ०.९७ ते उणे ०.४१ होणार असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. चंद्रग्रहण पाहणे डोळ्यांना हानिकारक नसल्याने  पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. साध्या डोळ्यांनी ही चंद्रग्रहणाचा आनंद लुटता येईल. ग्रहण हि एक खगोलीय घटना आहे. त्याचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही. तरी हे ग्रहण पहावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second lunar eclipse of the year on five june