गडहिंग्लजला कांदा, मिरचीच्या रोपांचे दर तेजीत

दीपक कुपन्नावर
Monday, 11 January 2021

गडहिंग्लज येथील आठवडा बाजारात मागणीमुळे रोपांचे दर तेजीत आहेत. भाजी मंडईत आवक वाढल्याने फळभाज्याचे दर उतरले आहेत.

गडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात मागणीमुळे रोपांचे दर तेजीत आहेत. भाजी मंडईत आवक वाढल्याने फळभाज्याचे दर उतरले आहेत. पालेभाज्यांची आवक हाउसफुल्ल झाल्याने स्वस्त आहेत. फळांचे दर टिकून आहेत. जनावरांच्या बाजारात म्हशीचे, शेळ्या, बकरीचे दर वधारले आहेत. 

गेल्या दोन महिन्यापासून उसाच्या लावणीत, खोडवात लावण्यात येणाऱ्या फळभाज्या, कादा रोपांची आवक सुरू झाली. कनाटकातील बेळकुड (ता. चिक्‍कोडी) येथील 20 पेक्षा जास्त विक्रेते आले होते. येथील गुणे गल्ली परिसर रोपांनी फुलून गेला होता. कादा, मिरची, टोमॅटो याच्या रोपांच्या पेढीचा दर 15 ते 30 रुपये असल्याचे विकेते शकर पाचछापुरे यांनी सांगितले.

पालेभाज्यासह कोथिंबीरची आवक वाढली आहे. भाजी मंडईत मागणीपेक्षा पालेभाज्यांची आवक हाउसफुल झाली आहे. मेथी, लाल भाजी, पालक, शेपू यांच्या 100 पेढ्यांचा दर केवळ 300 ते 400 रुपये आहे. किरकोळ बाजारात चार ते पाच रुपये दराने विक्री आहे. कोथिंबिर पाच रुपये पेंढी असा भाव आहे. 

कोबी, वागी, ढबू आणि टोमॅटोची सर्वाधिक आवक आहे. सरासरी 150 ते 250 रुपये दहा किलो असा भाव आहे. कांदा 2000 ते 3500 रुपये क्विंटल तर, किरकोळ बाजारात 25 ते 40 रुपये किलो अशी विक्री सुरू आहे. लसूण 6000 ते 10000 रुपये क्विंटल तर, किरकोळ बाजारात 70 ते 120 रुपये किलो असा दर आहे. जनावरांच्या बाजारात आज दीडशेहून अधिक म्हशीचे आवक होऊन 20 ते 85 हजारांपर्यंत दर आहेत. शेळ्या मेढीचे 3 ते 12 हजारांहून अधिक दर आहेत. 

फळांचे दर टिकून 
फळबाजारात मार्गशीर्ष महिन्यामुळे दर टिकून आहेत. सर्वच फळांची आवक वाढली आहे. नागपूर परिसरातून येणारी संत्री-मोसंबी तर हिमाचल प्रदेशातून येणारे सफरचंद, स्थानिक पेरू, चिकू अशा सर्व फळांची आवक जास्त आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seedling Rates Rise In Gadhinglaj Kolhapur Marathi News