आता सुरु होणार 'आम्ही कोल्हापुरी पोषणात भारी'

september month anganwadi workers various nutrition related messages provided to home in kolhapur
september month anganwadi workers various nutrition related messages provided to home in kolhapur
Updated on

कोल्हापूर : 'आम्ही कोल्हापुरी पोषणात भारी' या घोषवाक्‍यासह जिल्ह्यात पोषण माह ऑनलाईन शुभारंभ सोहळा आणि पोषण अभियान फेसबुक पेजचा अनावरण सोहळा झाला. कोरोनाच्या संकटातही सप्टेंबर महिन्यात पोषण माहचे विविध पोषण संदेश अंगणवाडी सेविका घरोघरी पोहोचवणार आहेत.

याचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिलाबाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वातीसासणे, प्रकल्पसंचालक रवी शिवदास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरणलोहार यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सुचविलेल्या "आम्ही कोल्हापुरी, पोषणात भारी' या घोषवाक्‍याचे अनावरणही यावेळी झाले. या घोषवाक्‍याचा सर्व कार्यक्रमात वापर करण्याचे आवाहन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. कोरोना असला तरी संपूर्ण सप्टेंबर महिन्यात या पोषणमाहचे विविध पोषण संदेश सेविका मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचवतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केला. या पोषण महिन्यामध्ये अंगणवाड्यांमध्ये जास्तीत जास्त पोषण परसबाग तयार कराव्यात, असे आवाहन महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा पोषण समन्वयक पूनम पाटील, नितीन खोत, तसेच महिला बाल कल्याण समिती सदस्य, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com