‘जनता कर्फ्यू’वर नियंत्रण ठेवणार ही १४ पथके....

Settlement for Janata Curfew kolhaur marathi news
Settlement for Janata Curfew kolhaur marathi news

कोल्हापूर : रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’साठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. शहरात सहा, तर इचलकरंजीत चार ठिकाणी अशी जिल्ह्यात १४ विशेष पथके नेमण्यात आली आहेत. ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाल्यास कोरोना प्रतिबंधाचा उद्देश साध्य होणार आहे. सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घराबाहेर न पडणे उचित ठरणार आहे; पण वैद्यकीय कारणासाठी घरातून बाहेर पडणे अत्यंत गरजेचे असेल तर संबंधितांनी हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. 

गरज निर्माण झाल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा

कायदा सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या व शासनस्तरावर कर्फ्यू लावला जातो. कोरोना प्रतिबंधक म्हणून रविवारीचा कर्फ्यू हा जनतेने स्वेच्छेने लादून घेतला आहे. सकाळी ७ ते ९ रात्री असा १४ तास हा कर्फ्यू पाळला जाणार आहे. याकाळात नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत. महत्त्वाची गरज निर्माण झाल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मागविली जाईल. कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी जनतेने हे पाऊल उचलले आहे. कर्फ्यू काळात जिल्ह्यात हद्दीतील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्‍यक कामासाठी घरातून बाहेर पडू नये. जिल्हा पोलिस दलाकडून गर्दी होऊ नये. यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. कर्फ्यू नंतरही नागरिकांनी खरेदीसाठी दुकानात गर्दी करणे टाळल्यास तर कर्फ्यूचा उद्देश साध्य होईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

१०८ रुग्णवाहिका अगर व्हिडिओ कॉल वर संपर्क साधावा.

कर्फ्यू काळात आवश्‍यकता वाटल्यास नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका, पोलिस कंट्रोलरूम आदींशी फोनवरून अगर व्हिडिओ कॉल करून संपर्क साधावा. त्यांना तातडीने मदत पुरविण्यात येईल. 
डॉ. अभिनव देशमुख (पोलिस अधीक्षक)

 हेही वाचा-१४ ठिकाणी विशेष पथके...
किणी, कोगनोळी टोल नाक्‍यासह निवडणुकीच्या काळात शहरासह इचलकरंजीतील एसएसटी पॉईंट अशा १४ ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. फुलेवाडी नाका, आपटेनगर, कळंबा, शाहू टोल नाका, आर.के.नगर, शिरोली टोलनाका आदींचा यात समावेश आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने या पथकाकडून वाहनातून प्रवास करणाऱ्या परदेशी नागरिकांची चौकशी केली जाणार आहे. तसेच ताप, सर्दी, खोकला, श्‍वसनाचा त्रास कोणाला जाणवतो का, याचीही विचारणा केली जाणार आहे. वैद्यकीय पथके उपलब्ध झाल्यास संबंधित प्रवाशांची जागेवरच तपासणी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

पोलिसांकडून जनजागृती...
सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून बस, रेल्वे स्थानक परिसरास शहरातील मुख्य चौकात माईकवरून गर्दी करू नका, ज्येष्ठांनी अशा सूचना देण्यात येत होत्या. यात मध्यवर्ती बस स्थानक परिसर, स्टेशन रोड, रेल्वे स्थानक, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, भाजी मार्केटसह इचलकंरजीतील कबनूर, गांधी चौक आदीसह शहरातील मुख्य चौकात हे प्रबोधन केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com