कोल्हापुरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या जागी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे रुजू होणार आहेत.

कोल्हापूर : गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा काढले. येथील जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे रुजू होणार आहेत.

हेही वाचा - 101 चं याडचं भारी ; मानसिंगरावांची नित्य सवारी...! 

 

डॉ. देशमुख यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये येथील अधीक्षकपदाची सूत्रे घेतली. त्यांच्या कारकीर्दीत सर्वाधिक मोका कारवाया झाल्या. त्यांनी गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून काम करताना नक्षलवादी भागात उल्लेखनीय कार्य केले. त्याबद्दल नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना आंतरिक सेवा पदक जाहीर केले आहे.

हेही वाचा -  महापालिकेचे अर्थकारण कोलमडले  ; कोरोनाने विकासकामांना बसली खीळ

 

योगायोग म्हणजे डॉ. देशमुख यांची गडचिरोलीतून कोल्हापूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बलकवडे यांची गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे गोंदियाच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांचीही येथे बदली होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सांगलीच्या अधीक्षकपदी सिंधुदुर्गचे अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती झाली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh Balkawade will join kolhapur district as a Superintendent of Police