
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर बाहेर जाण्याच्या मार्गाच्या डाव्या बाजूला हा नऊ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे
कोल्हापूर - जिल्हा परिषद प्रांगणातील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि जिल्हा परिषद इमारतीच्या चौथ्या मजल्याचे अनावर राष्ट्रवादी कॉंग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात करण्यात आले. त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था सुरु करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील असणारा राज्यातील हा पहिला पुतळा आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर बाहेर जाण्याच्या मार्गाच्या डाव्या बाजूला हा नऊ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. 12 मार्च 2020 ला केले या पुतळ्याचे अनावरण केले जाणार होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमूळे अनावरण पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान, आज ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याहस्ते मोठ्या थाटात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष अशोक पोवार, कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, खजानिस रमेश मोरे, किसन कल्याणकर, माणिक मंडलिक, जयकुमार िंशदे, संभाजीराव पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंदपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.
पुतळा समितीचा इतिहास
राज्यात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा असावा यासाठी माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी 1986 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याच नावाने प्रतिष्ठान काढले. त्यानुसार हा पुतळा बसविण्याचे नियोजन करण्यात आले.
हे पण वाचा - अजित दादांच्या मतावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया वाचा सविस्तर
असा आहे पुतळा :
कोल्हापूरमधील बापट कॅम्प येथील कारागरी संजय तडसरकर यांनी ब्रॉंझमध्ये हा पुतळा साकारला आहे. 6 महिने हे काम चालले होते. 1 टन वजनाच्या पुतळ्यासाठी सुमारे 12 लाख खर्च आला आहे. तर उंची 9 फुट उंची आहे.
या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा
दिल्लीत संसद भवन परिसर, कराड अर्बन बॅंक, सातारा जिल्हा बॅंकेसमोर आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेसमारे हा पुतळा उभारण्यात आला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे