‘मी चुकूच शकत नाही, शौमिका यांच्या टि्वटची राजकीय क्षेत्रात चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

शौमिका महाडिक यांनी आज केलेले  टि्वट चांगलेच चर्चेत आले आहे.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांनी आज केलेले  टि्वट चांगलेच चर्चेत आले आहे. ‘मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा दावा नाही’ अशा आशयाच्या टि्वटने राजकीय क्षेत्रात मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

सौ. महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी ट्‌विटरवर केलेल्या टीकेमुळे त्या ट्रोलही झाल्या होत्या; पण त्यांनी आपली बाजू खंबीरपणे मांडत टीकाकारांना उत्तर दिले होते. काल ( १२) महाडिक यांनी ट्‌विट केले होते, त्यात ‘आज गोपाळकाला आहे, महाभारतात कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले त्या श्रीकृष्णाचा दिवस’ असे म्हटले होते. यानंतर अर्ध्या तासांतच त्यांनी दुसरे ट्‌विट टाकले, त्यात ‘मगाशी मी एका ट्‌विटमध्ये चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. 

हेही वाचा- बाप्पाच्या डोळ्यांत जिवंतपणा  आणण्याचे खास कौशल्य ; वाचा सविस्तर... -

मीच मॅच्युअर असा दावा नाही
माणसाकडून चुका होतात, जेमतेम दोन-तीन मिनिटांत चूक कळताच मी ती सुधारली. तरीही मी चुकले हे मला बिलकूल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एक जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही’ असा टोला लगावला आहे. या ट्‌विटमुळे त्यांना ट्रोलही व्हावे लागले पण त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ट्रोल करणाऱ्यांना तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा ट्‌विट आणि फेसबुकद्वारे दिला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaumika Mahadik Former President of Zilla Parishad Tweet political platform discussed