
उतूर (कोल्हापूर) - आजरा तालुक्यात उतूर परिसरात एका घरामागील नारळाच्या बागेत शेकरु या दुर्मीळ प्राण्याचे दर्शन झाले. घरामागे कावळ्यांचा आवाज सुरु झाला म्हणून घरमालकाने त्या ठिकाणी जावून पाहीले यावेळी त्याना झाडावरील पानामध्ये हालचाल आढळली. सुरवातीला त्याना माकड किंवा मोठी खारुताई असावे असे वाटले मात्र कावळ्यांची संख्या वाढत केली व त्यानी त्या प्राण्याचा पाठलाग सुरु केला. यामुळे तो नारळाच्या व शेवग्याच्या झाडावरुन इकडून तिकडे उड्या मारु लागला. त्या व्यक्तीने त्याचा फोटो काढला. मोबाईल मध्ये सर्च करुन माहीती घेतली त्यावेळी त्याना हा प्राणी म्हणजे महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु असल्याची माहीती मिळाली. अतिशय देखणा आणि सह्याद्रीच्या दाट झाडीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणारा हा प्राणी आंबोली व आजरा तालूक्यात कासारकांडगाव या जंगलात आढळला होता.
सह्याद्री पर्वतरांगांतील भीमाशंकर अभयारण्य, मध्य प्रदेश भागात शेकरू आढळतो. खारीच्या वर्गात मोडणारा हा प्राणी आकाराने त्यापेक्षा मोठा असतो. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात किंदळ व उंबरसारख्या झाडांवर हमखास आढळत होती. परंतु आता त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगलतोडीमुळे संकुचित झाला आहे. अन्नाच्या शोधात हा शेकरु या परिसरात आला असावा.
येथे आढळतो शेकरू
भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या एकूण ७ उपप्रजाती आढळतात. महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाळ, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगांत, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेही तो दिसतो. विविध प्रकारची फळे व फुलांतील मधुरसाचे भक्षण हे त्याचे खाद्य असते.
शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलमकोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.
सुरक्षेसाठी सहा ते आठ घरटी
शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुस-या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी घेऊ शकतो. त्यामुळे याला उडणारी खारदेखील म्हणतात. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत. त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी पिले देतात. या फसव्या घरट्यामुळे पिलांचे शत्रूपासून रक्षण होते.
या परिसरात जावून पाहणी केली. हा प्राणी चपळ आहे.त्याला थंड हवेच्या ठिकाणाची सवय आहे. नेमका या परिसरात कसा आला हे सांगणे कठीण आहे. याबाबात वरिष्ठांना माहीती देण्यात आली आहे.
नागेश खोराटे - वनरक्षक गडहिंग्लज.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.