शिनोळीच्या शिवभक्तांचा 486 किमी पायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

शिनोळी (ता. चंदगड) येथे शिवजयंती निमित्त सोळा तरुणांनी रायगडावरुन शिवज्योत आणली. चार दिवस सुमारे 486 किलो मीटर पायी प्रवास करुन त्यांनी ही शिवज्योत गावात आणली. शिवप्रतिमेबरोबरच शिवज्योतीची गावातून मिरवणुक काढण्यात आली. 

चंदगड : शिनोळी (ता. चंदगड) येथे शिवजयंती निमित्त सोळा तरुणांनी रायगडावरुन शिवज्योत आणली. चार दिवस सुमारे 486 किलो मीटर पायी प्रवास करुन त्यांनी ही शिवज्योत गावात आणली. शिवप्रतिमेबरोबरच शिवज्योतीची गावातून मिरवणुक काढण्यात आली. 

शिवजयंतीला ऐतिहासिक गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा आहे. शिनोळी येथील तरुण पारगड, महिपाळगड येथून शिवज्योत आणत असत. परंतु या वर्षी रायगडावरुन शिवज्योत आणण्याचे ठरवण्यात आले.

त्यानुसार प्रदीप पाटील, प्रितम पाटील, किसन काकतकर, गजानन सांबरेकर, राकेश तरवाळ, जयराम तरवाळ, आकाश पाटील, सतीश पाटील, अंकित पाटील, अमर बोकमुरकर, पवन पाटील, महादेव पाटील, गुरुप्रसाद पाटील, सुरज मन्नोळकर, पुंडलिक ओऊळकर, गौतम पाटील यांनी ही जबाबदारी उचलली. या सर्वांचा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, ग्रामपंचायत तसेच ओंकार ट्रेडर्स यांच्या वतीने सत्कार झाला. शुभम खांडेकर याची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार झाला.

पहाटे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त पाळणा तसेच सुंटवडा वाटण्यात आला. सायंकाळी गावातील श्रीराम विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सरपंच नम्रता पाटील, सदस्या भारती पाटील, जयश्री तरवाळ, गुणवंता ओऊळकर, बाळासाहेब पाटील, शिवाजी खांडेकर, गजानन पाटील, ग्रामसेवक व्ही. पी. नाईक, प्रशांत पाटील, अजित खांडेकर, किसन पाटील, निंगाप्पा पाटील, सरपंच भरमा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shinoli's Youngers 486 km Travel on foot Kolhapur Marathi News