भारतीय बाजारपेठेचाच दिलासा: विदेशात गुलाबाला ‘रेड’ सिग्नल

shirol rose red signal abroad valentine day marathi news kolhapur
shirol rose red signal abroad valentine day marathi news kolhapur

जयसिंगपूर (कोल्हापूर)  : युरोपमध्ये अद्यापही सुरू असलेले लॉकडाउन, गुलाब निर्यातीसाठी विमान वाहतुकीच्या भाड्यातील तिप्पट दरवाढ आणि बाजारपेठेचा अंदाज नसल्याने फूलशेतीतील पूर्वनियोजनामुळे यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’साठी जिल्ह्यातून केवळ २ लाख गुलाबांची निर्यात झाली आहे. दरवर्षी हे प्रमाण १८ ते २० लाख असते. कोरोनामुळे फूलशेती कोमेजली असून यावर्षी देशांतर्गत बाजारपेठेतच गुलाबांची निर्यात होणार आहे. देशांतर्गत बाजारात गुलाबांना मागणी अधिक असून दरही चांगला मिळत असल्याने यामुळे फूल उत्पादकांना काहीसा आधार मिळाला आहे. 

‘व्हॅलेंटाईन डे’साठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी १८ ते २० लाख गुलाबांची लंडन, ग्रीस, युके, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये निर्यात केली जात होती. कोरोनामुळे दहा महिने फूलशेतीही लॉकडाउन झाली. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर देश-विदेशातील गुलाबांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी नियोजन केले जाते. लॉकडाउनमध्ये उत्पादित झालेला चांगल्या दर्जाचा गुलाबही रस्त्यावर फेकण्याची वेळ उत्पादकांवर आली. 

विमान वाहतुकीत तिपटीने वाढ

व्हॅलेंटाईन डे’साठी दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १८ ते २० लाख गुलाबांची विविध देशांमध्ये निर्यात केली जात होती. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक समस्या फूल उत्पादकांपुढे आहेत. गुलाबांची निर्यात करण्यासाठी विमान कंपन्यांनी तिप्पट दरवाढ केली आहे. त्यामुळे निर्यात करणे परवडणारे नाही. त्यामुळे यावर्षी देशांतर्गत बाजारपेठांवरच मदार असणार आहे. 
-रमेश पाटील, सीईओ, श्रीवर्धन बायोटेक, कोंडिग्रे

निर्यात 
थंडावलेले देश 
ग्रीस, युके, ऑस्ट्रेलिया, जपान, इटली. 
देशांतर्गत या बाजारात संधी 
मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, बडोदा, दिल्ली, मध्य प्रदेश, भोपाळ, गोवा. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com