तरुणीने पंचगंगेत उडी मारताच घाबरलेल्या प्रियकराने क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात घेतली उडी

Shivaji Bridge suicide case in love affair kolhapur
Shivaji Bridge suicide case in love affair kolhapur
Updated on

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून एका तरुणीने आज दुपारी शिवाजी पुलावरून थेट पंचगंगेत उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी प्रियकरानेही पाण्यात उडी घेतली. नागरिकांच्या मदतीने तरुणीला त्याने सुखरूप बाहेर काढले. या मदत कार्यात शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी ही जखमी झाले.


याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती

गोकुळ शिरगाव परिसरातील एक तरुणी आणि पन्हाळा तालुक्यातील एक तरुण आज दुपारी मोटरसायकलजवळ शिवाजी पुलावर थांबले होते. त्यांच्यात दीर्घकाल चर्चा सुरू होती. त्यातच अचानक संबंधित तरुणीने थेट पुलावरून पंचगंगेत  उडी घेतली. घाबरलेल्या प्रियकराने क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाठोपाठ थेट पाण्यात उडी घेतली.हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी ओरडा केला. याची माहिती मिळताच याठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संदीप निळपणकर मदतीसाठी धावून गेले. घाटावरील पायर्‍यांवरुन ते खाली पडले. त्याला किरकोळ दुखापत झाली.


दरम्यान, संबंधीत तरुणीला प्रियकराने पाण्याबाहेर आणण्यास सुरुवात केली. त्यावेळेला त्याच्या मदतीला रणवीर नावाचा एक स्थानिक तरुण पोहत पाण्यात गेला. तसेच गणेश कुंडले, संदीप शेडबाळे, प्रशांत भाट, ऋषिकेश लवटे यांच्या मदतीने संबंधित तरुणीला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर त्या दोघांना करवीर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे दोघांच्या नातेवाईकांना बोलून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Irrigation Department farmers news
Kolhapur football fans FIFA World Cup celebration
Kasba Beed gold coin discovery
Kolhapur Vehicle Entry Tax
Marathi News Esakal
www.esakal.com