esakal | 6 एप्रिलला होणार शिवाजी विद्यापीठाचा  दीक्षांत समारंभ ; पदवी प्रमाणपत्रासाठी ही शेवटची तारीख

बोलून बातमी शोधा

Shivaji University Convocation on April 6 education marathi news}

. या मुदतीपूर्वी विद्यार्थ्यांनी पोस्टव्दारे अथवा प्रत्यक्षात येवून हार्ड कॉपी जमा करावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले.

kolhapur
6 एप्रिलला होणार शिवाजी विद्यापीठाचा  दीक्षांत समारंभ ; पदवी प्रमाणपत्रासाठी ही शेवटची तारीख
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

.कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ 6 एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍नभूमीवर ऑलनाईन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभाचे अध्यक्ष कुलपती भगसिंह कोश्‍यारी आणि प्रमूख पाहुणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून समारंभात उपस्थित राहतील. 


शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधून सुमारे 77 हजार 300 विद्यार्थ्यांनी पदवीसाठी नोंदणी केली आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी दीक्षांत विभागात जमा करण्याची अंतिम मुदत बुधवार (ता.10) पर्यंत आहे. या मुदतीपूर्वी विद्यार्थ्यांनी पोस्टव्दारे अथवा प्रत्यक्षात येवून हार्ड कॉपी जमा करावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले. राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती मेडल विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा या समारंभाच्या दोन दिवस आधी जाहीर केली जाणार आहेत. अशी माहिती कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी दिली. 

हेही वाचा- 23 वर्षीय ऋषीकेशने शोधली वेगळी वाट ; कांचनवाडीची टुडी फ्रुटी थेट दुबई, बांगलादेशात -

महाविद्यालयातील दीक्षांत समारंभासमोर प्रश्‍नचिन्ह 
महाविद्यालयाच्या पातळीवर होणारे दीक्षांत समारंभ कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कसे होणार हा प्रश्‍न प्राचार्यांसमोर आहे. याबाबतचा निर्णय विद्या परीषदेच्या बैठकीत घेतला जाईल. असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.  

संपादन- अर्चना बनगे