शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

बुधवारी (ता.21) आणि त्यानंतर सर्व पेपर हे ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच होतील.

कोल्हापूर - चक्रीवादळामुळे शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता.17), सोमवार (ता.19) आणि मंगळवारी (ता.20) होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

बुधवारी (ता.21) आणि त्यानंतर सर्व पेपर हे ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच होतील. अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

परिपत्रकातील माहितीनुसार, वेधशाळेने पुढील काही दिवस चक्रीवादळाची शक्‍यता वर्तवली आहे. त्याचा परिणाम शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांवरही झाला आहे. 17 ऑक्‍टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र चक्रीवादळामुळे 17, 19 आणि 20 ऑक्‍टोबरला होणारे पेपर पुढे ढकलले आहेत. त्या त्या अभ्यासक्रमाची परीक्षा ज्या दिवशी संपते त्याच्या पुढे तीन दिवस सलग हे पेपर होणार आहेत. 21 ऑक्‍टोबर आणि त्यानंतर होणारे सर्व पेपर ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच होतील. 

हे पण वाचामराठा आरक्षणासाठी लाल महाल ते लाल किल्ला आंदोलन छेडणार ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

सराव परीक्षा सुरू 

आजपासून विद्यापीठाच्या सराव परीक्षांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेल आयडी आणि एस.एम.एस वर लिंक शेअर करण्यात आली. त्यामध्ये असणारी प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडवली. 50 हजार विद्यार्थ्यांना लिंक पाठवली होती. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली. ही सराव परीक्षा दिली असून पुढील 10 दिवस ती सुरू राहाणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji University exams postponed