esakal | ब्रेकिंग - अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा स्थगीत 
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji university final year exams postponed against

उच्च शिक्षण संचलनालयाने बी.एडच्या परीक्षा याच कालावधीत असल्याने विद्यापीठीय परीक्षा नकोत अशी सूचना केली

ब्रेकिंग - अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा स्थगीत 

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या अंतीम वर्षाची परीक्षा पुन्हा स्थगीत करण्यात आली. या परीक्षा बुधवार (ता.21) पासून सुरू होणार होत्या. मात्र पुन्हा या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. आता सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा मंगळवार (ता.27) पासून सुरू होतील. उच्च शिक्षण संचलनालयाने बी.एडच्या परीक्षा याच कालावधीत असल्याने विद्यापीठीय परीक्षा नकोत अशी सूचना केली. त्यामुळे अंतीम वर्षाच्या परीक्षा स्थगीत करण्यात आल्या. विद्यापीठाने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा म्हणजे अडथळ्याची शर्यत झाली आहे. सुरुवातीला या परीक्षा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील असा अंदाज होता. मात्र त्या शनिवारी (ता.17) होतील असे जाहीर करण्यात आले. मात्र या काळात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे परीक्षा बुधवार (ता.21) पासून होणार असे जाहीर करण्यात आले. मात्र आता या परीक्षा पुन्हा पुढे गेल्या आहेत. राज्याच्या उच्च शिक्षण संचलनालयाने विद्यापीठाला याबाबत पत्र पाठवले.

हे पण वाचामहाराष्ट्रात तीन सावत्र भावांचे सरकार 

राज्यात सर्वत्र बी.एडची परीक्षा असल्याने या काळात विद्यापीठाच्या परीक्षा घेऊ नयेत असे पत्रात सांगितले आहे. तसेच या कालावधीत अतीवृष्टीची शक्‍यता असल्याने तांत्रिक समस्याही येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या परीक्षा सोमवार (ता.26) पर्यंत स्थगीत केल्या असून मंगळवार (ता.27) पासून परीक्षा होईल.

हे पण वाचा - 'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार' 

संपादन - धनाजी सुर्वे  

go to top