'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पुकारला होता. यात मार्च, एप्रील, मे महिन्यात रिडींग घेतलेले नाही

कोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे ठोको आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करण्याचा इशारा राज्य इरिगेशन फेडरेशनसह सर्व पक्षीय प्रतिनिधींनी दिला. यावेळी जोरदार खडाजंगी चर्चा झाली मात्र, बहुतेकांनी वीज बिल माफीवर भर दिला. 

कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पुकारला होता. यात मार्च, एप्रील, मे महिन्यात रिडींग घेतलेले नाही. त्यानंतर सरासरी बिल आले. यात वीज बिल दरवाढ झाल्याने अनेकांची अडचण झाली. अशात लॉकडाऊन काळात रोजगार हिरावले गेले. व्यवसाय कोलमडले. अनेकांचे पगार निम्म्याने कमी झाले, यासर्वांमुळे घराघरात अर्थिक ताण वाढला आहे. अशात वीज दरवाढ झाल्याने वीजेचे बिल तिन महिन्यांचे एकत्रपणे वाढून आले. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना वाढीव दराने वीज बिले भरणेही अशक्‍य झाले. ही पार्श्‍वभूमी विचारात घेता गेली, सहा महिन्यांतील वीज बिले माफ करावीत अशी मागणी सर्व पक्षीय घटकांनी केली. 

वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे व माजी महापौर आर. के. पोवार यांनी मांडला. 

असाच हाच मुद्दा इरिगेशन फेडरेशनचेही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सहकारी पाणी पुरवठा संस्था त्यांच्या वीज बिलांच्या बाकी पोटी काही रक्कम भरणार असतील तर त्यांना हप्तेकरून द्यावेत त्या प्रमाणेचे वीज बिले भरून घ्यावीत, थकबाकीसाठी संस्था व शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी अपेक्षाही इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. 

जयकुमार शिंदे, बाबासाहेब देवकर, किशोर घाटगे, बाबा पार्टे, अशोक भंडारे आदी उपस्थित होते. 

वीज बिले वसुलीसाठी महावितरणकडून वारंवार कॉल येतात, मनस्ताप होतो. वीज बिले माफीचा निर्णय शासनस्तरावर होत नाही तो पर्यंत वीज बिल वसुलीसाठी तगादा लावू नये अशी मागणी कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदूलकर यांनी केली. 

लोकांचे रोजगार गेले आहेत. अशात वीज दरवाढीचा भुर्दंड लोकांवर टाकू नये अशी मागणी चंद्रकांत यादव यांनी केली. बील माफी करण्याची आग्रही मागणी अनेक पदाधिकाऱ्यांनी लावून धरली अनेकांनी मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. 

हे पण वाचाकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आजची ओमकाररूपिणी रूपात पूजा

शाब्दीक चकमक 
वीजे बिलांची आत्ता पर्यंतची थकबाकी किती आहे, अशी विचारणा रमेश मोरे यांनी केली. तत्काळ दाखवा, तुमच्याकडे आकडेवारी तयार नाही का अशी खड्या आवाजात श्री. मोरे यांनी विचारणा केली. तेव्हा निर्मळे यांनीही आकडे वारी मागवली आहे, आकडे तयार आहेत बघून सांगतो थोडा धीर धरा असे सांगताना दोहोंत शाब्दीक चकमक उडाली. 

हे पण वाचामहाराष्ट्रात तीन सावत्र भावांचे सरकार

"त्यांचा' वीज पुरवठा खंडीत नाही 
अखेर श्री. निर्मळे यांनी वीज बिलांच्या वसुलीसाठी घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही. असे आश्‍वासन या बैठकीत दिले. तसेच वीज बिल माफीबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यालयाकडून त्यावर निर्णय अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state irrigation federation altimeter to electricity office