शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे हवी आहेत तर ही माहिती वाचा....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे गुणपत्रके, दाखले, प्रमाणपत्रे पाठविण्याची सोय उपलब्ध केली आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे गुणपत्रके, दाखले, प्रमाणपत्रे पाठविण्याची सोय उपलब्ध केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सुविधा केंद्रात न येता ऑनलाईन अर्जाद्वारे त्याची मागणी करू शकतात, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी पत्रकाद्वारे दिली. 

वाचा - विद्यापीठाने दिलीय सुट्टी पण तुम्ही करू शकता असा ऑनलाईन अभ्यास...

विद्यार्थी सुविधा केंद्रातून दुबार गुणपत्रक, टी.सी./ मायग्रेशन, पासिंग/मेरिट/रॅंक, ट्रान्सक्रिप्ट, गुणतक्ता पडताळणी व अन्य कागदपत्रांच्या मागणीसाठी www.unishivaji.ac.in संकेतस्थळावर Exam या लिंकवर http://www.unishiavji.ac.in/exam/students-Faciliation-Centre वर अर्ज डाऊनलोड करावा. अर्जातील माहिती भरून अर्ज स्कॅन करून तो विद्यार्थी सुविधा केंद्राच्या sfc@unishivaji.ac.in येथे मेल पाठवावा. विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केलेल्या अर्जावर फी बाबत तसेच पोस्टेज खर्च याविषयी सूचना आहेत. त्याप्रमाणे अर्जाची फी Finance and Account Officer, Shivaji University, payable at Kolhapur या पत्त्यावर पाठवावी. डी. डी.ची पावती झाल्यानंतर विद्यार्थ्यांची कागदपत्रे काढून त्याला ती पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील. त्यासाठी शासनाच्या लोकसेवा हक्क अधिनियम 2015 "आपले सरकार' महाऑनलाईन पोर्टलवरून उपलब्ध असणाऱ्या प्रक्रियेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji University students have the facility of sending marks, certificates, certificates through post.