'भाजप राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करेल' 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचे भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा यशस्वी वाटचाल करत आहे

कोल्हापूर - राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. पण केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचे भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा यशस्वी वाटचाल करत आहे. देशातील प्रमुख सत्ताकेंद्रासह राज्यातील लहान-मोठी सत्तास्थाने ताब्यात असलेला भाजप महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा काबीज करेल, असा विश्‍वास भाजपा ग्रामीण महिला अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. 

नवरात्रोत्सवानिमित्त भाजपतर्फे आयोजित नवदुर्गा सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे होत्या. आई अंबाबाईला कमळ प्रिय आहे म्हणून तिचा आशीर्वाद घेऊनच आजपासून कामाला सुरुवात केली आहे. नव्या जोमाने पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोचवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. त्या म्हणाल्या,""शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससोबत आघाडी करून महाराष्ट्रातील सत्ता मिळवली असली तरी केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे, हे त्यांनी विसरू नये.'' राज्यात भाजपला 105 जागा मिळालेल्या असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केले. 

खापरे यांनी पक्षाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी नव्या जोमाने काम करावे, असे आवाहन केले. हॉटेल अयोध्यामध्ये महाडिक यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना गौरविले. पोलिस उपअधिक्षक पद्मा कदम, पुष्पा पाटील, प्रिया दंडगे, स्मृती खांडेकर, सरिता रानगे व दाक्षियानी जाधव यांना सन्मानित केले. 
यावेळी डॉ. निता माने, शिल्पा पाटील, सुवर्णा पाटील, सुलोचना नार्वेकर, मेघाराणी जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

हे पण वाचा शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ

 

अंतर्गत गटबाजीचे दर्शन 
नवरात्रोत्सवानिमित्त भाजपातर्फे नवदुर्गांचा सन्मानाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. बिंदू चौकातील पक्ष कार्यालयात शहरी तर शहरातील हॉटेल आयोध्यामध्ये ग्रामीण विभागाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती. 

हे पण वाचाखडसे यांचे आता उतार वयातील राजकारण, त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही

 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shomika mahadik criticism on maharashtra government