'काटा मारणाऱ्यांचा काटा जनताच काढणार' 

shrimant kokate speech in kolhapur
shrimant kokate speech in kolhapur

कोल्हापूर - उसाच्या वजनात जे काटा मारतात, त्यांचा काटा निवडणुकीत जनताच काढेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे उमेदवार प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज दिला. प्रचारार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकाटे बोलत होते. 

कोकाटे म्हणाले, ‘‘विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. येथे विविध विषयातील तज्ज्ञ पाहिजेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्‍नांवर भूमिका मांडल्या पाहिजेत. त्यातून सर्वसमावेशक धोरणाची निर्मिती झाली पाहिजे; पण असे होत नाही. त्या ठिकाणीही राजकारणीच जातात. पक्षीय राजकारणातून हे सभागृह म्हणजे पुनवर्सन केंद्र झाले आहे. ज्यांना पदवीधरांचे प्रश्‍न माहीत नाहीत ते निवडणुकीला उभे आहेत. ते साखर सम्राट आहेत. शेतकऱ्यांचे शोषण करणारे, बॅंका बुडवणारे, कष्टकऱ्यांची पिळवणूक करणारे आहेत. या काटा मारणाऱ्यांचा काटा जनताच काढणार आहे. शिक्षक भरती, शिक्षणाच्या निधीत १० टक्केवाढ, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा करावा, शिक्षक दिन सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करावा.

इतिहासाचे पुर्नलेखन सुरू करावे, रुग्णांवर मोफत उपचार, वकिलांना पहिले पाच वर्षे १० हजार वेतन द्यावे. या मुद्‌द्‌यांसाठी मी काम करणार आहे. त्यामुळे पदवीधरांची पसंती नक्कीच मला असेल.’’

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com