
संसारात जम बसण्यापूर्वीच नीयतीने संसार गाड्यातील एक चाक निखळले; बाळ आणि बाळंतीनीचा रुग्णालयातच मृत्यू
चुये (कोल्हापूर) : हणबरवाडी (ता. करवीर) येथील श्वेता धनाजी वाडकर वय 21 यांचा प्रसुतीवेळी नवजात अर्भकासह मृत्यू झाला. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू गुरुवारी ता 18 सायंकाळी झाला तर आज पहाटे पाचच्या सुमारास मातेचा मृत्यू झाला अशी गंभीर तक्रार नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आज सकाळी केली.
यानंतर खासगी रुग्णालयाच्या बाहेर आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करून घेण्याच्या कारणावरुन ग्रामस्थांना ताटकळत थांबावे लागले. यानंतर सकाळी दहाच्या सुमारास रुग्णवाहिकेतून बाळंतिणीचा मृतदेह घेऊन ग्रामस्थ सरकारी रुग्णालयात दाखल झाले. याठिकाणी त्यांनी संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करावा आणि तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले. त्यानंतर तातङीने करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. मयत बाळंतीण महिलेला न्याय दिला जाईल असे सांगितल्यानंतर शवविच्छेदनची प्रक्रिया सुरू झाली दुपारी तीन नंतर ग्रामस्थानी मृतदेह ताब्यात घेतला आणि हणबरवाडी या ठिकाणी अंत्यसंस्कार केले. त्यांच्या मागे पती व सासू आहे.
हेही वाचा- 1970 च्या दशकातील उद्योगांची ही आहे अवस्था
कुटुंब उघड्यावर....
शेतकरी धनाजी वाडकर यांनी दोन वर्षापूर्वी श्वेता यांच्याशी विवाह केला होता संसारात जम बसण्यापूर्वी नीतीने संसार गाड्यातील एक चाक निखळले आणि वाडकर कुटुंब उघड्यावर आले