सहा ऍपे रिक्षा जप्त 

Six ape rickshaw seized
Six ape rickshaw seized

कोल्हापूर : आसन क्षमतेत वाढ करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा ऍपे रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आज कारवाई करण्यात आली. खासगी आराम बस पाठोपाठ कार्यालयाकडून केलेली ही दुसरी कारवाई ठरली. 

ग्रामीण परवाना असणारी वाहने शहरात आणि ऍपे रिक्षा शहरात अवैधरीत्या व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी कारवाईच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आज मोटार वाहन निरीक्षक बालाजी धनवे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गुरव यांनी शहरातील ऍपे रिक्षांची तपासणी केली. यात सहा ऍपे रिक्षांच्या आसन क्षमतेत फेरफार करून मागील बाजूला दोन आसने वाढवल्याचे निदर्शनास आले. दोषी आढळलेल्या सहा रिक्षा कार्यालयाने जप्त केल्या. 
या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम बसण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया प्रामाणिक रिक्षाचालकांच्यातून व्यक्त होत होत्या. 

तपासणी अचानक करणार डॉ. अल्वारिस 
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेतली जाते. त्यावेळी अवैधरीत्या व्यवसाय करणारे वाहनचालक निघून जातात. तपासणी थांबल्यानंतर पुन्हा व्यवसायास सुरवात करतात. त्यामुळे तपासणीची मोहीम ही आता अचानकपणे राबविली जाणार आहे. यात जर कोणी चालक दोषी आढळल्यास त्याच्यावर दंडाची व वाहनांच्या निलंबनाचीही कारवाई होणार आहे. त्यामुळे ग्रामीण परवानाधारक रिक्षाचालकांनी शहरात व्यवसाय करू नये, आसन क्षमतेत बदल करू नये, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नका आणि कागदपत्रे स्वतःच बाळगा, असे आवाहन डॉ. अल्वारिस यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com