साठ कोटींचा गूळ थप्पीला 

 Sixty crores of jaggery slapped
Sixty crores of jaggery slapped

कोल्हापूर ः गुळाचा समावेश अत्यावश्‍यक सेवेत असला तरी गुळाची चढ-उतार करण्यासाठी माथाडी कामगार नाहीत. गुजरातकडे पाठवलेला पोहोचेलच, याची शाश्‍वती नाही. अशात जवळपास 60 कोटींचा गूळ बाजारात तसेच शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला फटका बसत आहे.

महापुरामुळे पुरेशा प्रमाणात गुऱ्हाळघरांना ऊस मिळाला नाही. जो मिळाला त्यावर अनेक गुऱ्हाळघरांनी जेमतेम उत्पादन घेतले. सौदे सुरू झाले साडेतीन हजार ते चार हजारांच्या आसपास भाव मिळत होता. अशात कोरोनाचे संकट आले. लॉकडाऊनमुळे गूळ बाजारातील व्यवहार थांबले. लॉकडाऊनमधून जीवनावश्‍यक वस्तूंना वगळले आहे. गूळही जीवनावश्‍यक आहे, मात्र जिल्हाबंदी केल्याने गाड्या अडविल्या. होम क्वारंटाईनच्या भीतीने ट्रकचालक गाड्या भरत नाहीत.

शाहू मार्केट यार्डात बहुतेक गोदामात गूळ रवे आहेत. तो भरण्यासाठी माथाडी कामगार नाहीत. बहुतेक माथाडी कामगार लॉकडाऊनमुळे गावात अडकले आहेत. त्यांना कामावर येण्याची इच्छा असली तरी नाक्‍यावर अडवले जाते. पॅकिंगसाठी मटेरियल आणि माणसंही नाहीत. त्यामुळे गुळाची बाजारपेठ जीवनावश्‍यक असूनही ठप्प आहे.

माथाडींचा तुटवडा 
शाहू मार्केट यार्डात जवळपास 550 वर माथाडी कामगार आहेत. त्यातील 70 ते 80 माथाडी भाजीपाला बाजारात रोज काम करतात; मात्र गूळ बाजारात काम करणारे 300 माथाडी कामगार बहुतेक जण गावी आहेत. त्यांना येथे येऊन काम करण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा म्हणून पास द्यावा, अशी मागणी हमाल पंचायतीने माथाडी बोर्डाकडे केली होती; मात्र त्यावर काही निर्णय झालेला नाही. बाहेरगावचे माथाडी कामगार सध्या कोल्हापुरात येणे मुश्‍कील असल्याने माथाडी कामाचा पेच निर्माण झाला आहे. 

गूळ पडून 
पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ बाजारात आणण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गूळ तयार केला. तोपर्यंत लॉकडाऊन झाला. बहुतांशी गूळ गुऱ्हाळघरावर तर तेवढाचा गूळ बाजार समितीतील पेढ्यांवर पडून आहे. जवळपास दहा हजार गूळ रव्यांचे सौदे झाले आहेत; पण तो गूळ गुजरातला पोहोचू शकलेला नाही. 

गुळावर परिणाम 
कडक उन्हामुळे गुलाचा दर्जा घसरत आहे. तो झाकून ठेवला तरी त्याच्या रंगावर परिणाम होतो. थोडाफार प्रतवारीत फरक पडतो. परिणामी दर कमी होण्याचा संभव आहे. गुजरातमध्ये गूळ शिल्लक नाही. अशात कोल्हापूरबरोबर सांगली, कऱ्हाड व कर्नाटकाचा गूळही गुजरातमध्ये जातो, तोही बंद झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com