
लाखो शिवप्रेमी एकत्र जमतात. कोल्हापुरातून शेकडो कार्यकर्ते दरवर्षी पानिपतला रवाना होतात.
कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव या जयघोषात पानिपतच्या तिसऱ्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांना आदरांजली वाहण्याकरिता अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे कार्यकर्ते आज पानिपतला रवाना झाले.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत वीरांनी पराक्रम घडवला.
त्यांना आदरांजली वाहण्याकरिता हरियाणा राज्यातील पानिपतमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तेथे लाखो शिवप्रेमी एकत्र जमतात. कोल्हापुरातून शेकडो कार्यकर्ते दरवर्षी पानिपतला रवाना होतात.
हेही वाचा - अनेकांनी चिकन, अंडी खाण्यावर मर्यादा घातल्या आहेत
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हरियाणा राज्यातील पानिपत येथे यंदा साध्या पद्धतीने कार्यक्रम होत आहे. त्याकरिता कोल्हापुरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी मोजके कार्यकर्ते पानिपतला जाण्यासाठी एकत्र जमले.
हिंदी शिवचरित्रकार प्रा. डॉ. वसंतराव मोरे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर घोषणाबाजी झाली.
या वेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार प्रा. डॉ. आनंद पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रकाश पाटील, विनोद साळोखे, मराठा क्रांती मोर्चाच्या प्रज्ञा जाधव, आदित्य पाटील, नागेश वडगे, यश पराते, ओंकार माने, मंचचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील, प्रांजल लोखंडे, विलास सासने, राजाराम पाटील, हेमंत निकम, सागर शेटे उपस्थित होते.
चारचाकी वाहनातून सुमारे सतराशे किलोमीटर अंतर पार करत पानिपतला पोचणार आहोत. मार्गावरील धुळे, सुरत, चितोडगड, जयपूर, पानिपत, इंदूर, देवास लाईव्ह येथे पानिपतचा पूर्ण इतिहास लोकांना कळावा याकरिता बैठका घेणार असल्याचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - पाहूया, शिंदे यांच्या पायगुणानं तरी हद्दवाढीचं काही होतं काय ?
संपादन - स्नेहल कदम