Video - कोरोना हाय का नाय? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; डिजे लावून पालखी सोहळा

social distance not accepted people in kasaba tarale kolhapur in festival
social distance not accepted people in kasaba tarale kolhapur in festival

कोल्हापूर : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासंबधित लोकांना प्रशासन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी करत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असूनही अनेक ठिकाणी याचे उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना कोल्हापूर येथील कसबा तारळेत घडली. एका पालखी सोहळ्यात हजारो गावकऱ्यांनी एकत्र येत उत्सवावेळी सोशल डिसटन्सचा फज्जा उडवलेली घटना घडली आहे. जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही हा उत्सव साजरा केला आहे. 

या घटनेत ग्रामस्थांनी डीजे लावून पालखी उत्सव साजरा केला आहे. जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही उत्सव साजरा झाला आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा उडालेला फज्जाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ग्रामस्थ हजारोंच्या गर्दीने या उत्सवात सहभागी होत डीजेवर थिरकताना दिसत आहेत. 

गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दुप्पट रुग्ण आढळले होते. गुरुवारी 33 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या 187 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 50 हजार 286 कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी 84 हजार 358 कोरोनामुक्त झाले तर 1 हजार 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com