विद्यार्थ्यांनी बनविले सौर उर्जेवरील दिवे ; शंभर दिव्यांनी राजवाडा उजळणार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

उपक्रमात सौर उर्जेवर चालणारे दिवे (पणत्या) तयार केल्या आहेत.

इचलकरंजी - येथील "डीकेटीई'च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सौर उर्जेवरचे दिवे हे या वर्षीच्या दिवाळीचे विशेष आकर्षण आहे. दिवाळीचे औचित्य साधून डीकेटीईच्या आयईईई स्टुडंट ब्रॅंच अंतर्गत इलेक्‍ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी "दिवाळी 2020 सोलरवाली' असा अनोखा उपक्रम राबवला आहे. 

उपक्रमात सौर उर्जेवर चालणारे दिवे (पणत्या) तयार केल्या आहेत. या दिव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दिवे दिसायला पारंपरिक दिव्यासारखे दिसतात. सौर उर्जेवर चालणारे हे दिवे 3-4 तास सौर उर्जेमध्ये चार्जिंग केल्यास 8 ते 10 तास प्रज्वलित होतात. या दिव्यांना तेल, वात किंवा वीजपुरवठा आदी बाबी लागत नसल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक बचत होणार आहे. तसेच या दिव्यांची गुणवत्ता उत्तम प्रकारची असून हे दिवे दीर्घकाळ टिकण्यास सक्षम आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात 100 दिवे (पणत्या) तयार केले असून हे दिवे दिवाळीनिमित्त डीकेटीईच्या आवारात लावण्यात येणार आहेत. यावेळी आशिष पंजवाणी, संदेश पंतोजी, ज्ञानदा मिरजकर, उम्मेमिस्बाह भिस्ती, पंकज नलावडे, मेधावी पाटील, अमृता मुळे, हिृतिक गोरड, मिस्बा बेटगरी, आशुतोष धवलशंख, अनुजा पिसे, विळवे खेलकुंभे, ऐश्‍वर्या आडके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

हे पण वाचाकोल्हापूर ; कळंबा कारागृह प्रशासन सतर्क

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सोलर दिवे तयार करण्यासाठी संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डी. जी. पाटील, प्रा. व्ही. बी. मगदूम, प्रा. सौ. एस. ए. वडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar powered lamps made by DKTE students