कोल्हापूरच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप; 8 वर्षांच्या चिमुकल्याने दिला भडाग्नी

soldier sangram patil final funeral  in a military crematorium
soldier sangram patil final funeral in a military crematorium
Updated on: 

कोल्हापूर :कोल्हापूरचा वीरपुत्र संग्राम पाटील यांच्यावर त्यांच्या निगवे खालसा गावात  लष्करी इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. भारत माता की जय, संग्राम पाटील अमर रहेच्या घोषणांनी निगवे खालसा परिसर दुमदुमला.

कोल्हापूर ते निगवे खालसा मार्गावर पार्थिव जात असताना अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला रांगोळी काढण्यात आली होती तर रस्त्यावर फुलांचा सडा पसरण्यात आला होता. गावात पार्थिव आल्यानंतर त्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरासमोर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी,मुल, वडील यांनी हंबरडा फोडला. हे घर म्हणजे संग्राम यांचे स्वप्न होतं,मात्र ते अपुर राहील.  यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी एक कोटीची घोषणा केली.

गावात अंतयात्रा काढल्यानंतर संग्राम शिकलेल्या चन्नीशेट्टी विद्यालयाच्या प्रांगणात लष्कराने सलामी दिली. त्यानंतर भारताचा तिरंगा पाटील कुटुंबीयांकड सुपूर्द करण्यात आला.  त्यांच्या पार्थिवाला आठ वर्षाच्या मुलाने भडाग्नी दिला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union five nominated directors ordinance
Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
Satej Patil statement on Gokul chairman election
Gokul Milk Union Ordinance