पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापुरातील जवान संग्राम पाटील शहिद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

एकाच महिन्यात दोन घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राशिवडे बुद्रु' (कोल्हापूर) : आज सकाळी राजौरी मध्ये १६ मराठा च्या पोस्ट वर झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा ( ता. करवीर) येथील हवलदार  संग्राम पाटील शहिद झाले.  

  मराठा बटालियन मध्ये गेली सतरा वर्षे पाटील सेवा बजावत होते. अत्यंत प्रामाणिक आणि देशसेवेसाठी कर्तव्यदक्ष असलेले श्री.पाटील यांच्या आधारावर गावाकडे त्यांच्या आई-वडील भाऊ यांनी शेती आणि संसार उभा केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असून दोन वर्षांपूर्वी त्यांनी हवालदार पदाच्या पदोन्नतीसाठी आपली सेवा वाढवून घेतली होती. काल मध्य रात्री पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचा भंग झाल्याने त्यांनी केलेल्या गोळीबारात संग्राम हे शहीद झाले. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. 

   आज सकाळपासून गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चबुतरा बांधण्याचे कामही गावकऱ्यांनी हाती घेतले आहे. गावात मिलीटरी फौज व शासकिय अधीकारी आले आहेत.त्यांच्या मागे पत्नी, आई' वडील भाऊ बहीण पत्नी दोन मुले आहेत.

ऐन दिपावली सणाच्या वेळी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात  बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे  ऋषीकेश  जोंधळे हे जखमी होवून शहीद झाले होते.आज आणखी करवीर तालुक्यातील संग्राम पाटील जवान शहिद झाले आहेत. एकाच महिन्यात दोन घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soldier Sangram Patil from Kolhapur martyred in a cowardly attack by Pakistan