मुलगा वडिलाने साकारले गणिताचे ऍप!

संदीप खांडेकर
Saturday, 2 January 2021

कोल्हापूर : बापाचं डोकं गणितात वेगवान, तर लेकाची सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये हुशारी. कोरोनाच्या संचारबंदीच्या काळात दोघांच्या डोक्‍यात भन्नाट कल्पना आली. बापाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाच्या ऑनलाईन 
टेस्ट घेण्यासाठी ऍप तयार करण्याचा संकल्प केला. त्याला मुलाने "ग्रीन सिग्नल' दिला. रात्रंदिवस दोघांचं काम सुरू झालं आणि काही महिन्यांत sankalpexams.rf.gd ऍप तयार झाले. आजपर्यंत 85 चाचण्या घेतल्या. आठवी ते दहावीतील 174 विद्यार्थ्यांनी चाचण्या दिल्या आहेत. त्यांना ऍप विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे. रवींद्र पाटील व त्यांचा मुलगा पराग पाटील यांची ही कहाणी. 

श्री. पाटील संकल्प माध्यमिक विद्यालयातील गणिताचे हाडाचे शिक्षक. ते मूळचे इस्लामपूरचे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून बी.एस्सी. झाल्यावर शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी.ची पदव्युत्तर पदवी घेतली. बी.एड.चा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर संकल्प विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. कोरोनामुळे संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना गणिताच्या टेस्ट देण्याचा त्यांनी निश्‍चय केला. त्यासाठी मुलगा पराग याची मदत घेतली. परागने ऍप, तर पाटील यांनी गणिताच्या टेस्ट तयार करण्यासाठी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत वेळ खर्च करण्यात कसूर केली नाही. 
आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचे ऍपवर स्वतंत्र अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्यांना स्वतंत्र लॉगीन आयडी व पासवर्ड देण्यात आला. ऍपवर चाचण्या देण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर किती वेळात दिले, टॉप टेन कोण आहेत, प्रत्येक प्रश्नासाठी त्याने किती वेळ घेतला यासह त्याला बरोबर उत्तर लिहिण्याचे टप्पे सांगितले जातात. एका प्रकरणावर किमान तीन टेस्ट घेतल्या आहेत. परिणामी, ऑगस्टमध्येच त्यांचा गणिताचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. पुस्तकाबाहेरील ही काही गणिते विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हे ऍप विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करण्यात आले. ते केवळ संकल्प विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आल्याचे पाटील सांगतात. 

बहुआयामी व्यक्तिमत्त्व 
श्री. पाटील बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण आहेत. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी नेमबाजीचे धडे गिरविले. ते राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रही ठरले. गणित हा त्यांच्या आवडीचा विषय असून, शाळेतील सांस्कृतिक विभागाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. 

संपादन - यशवंत केसकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son-father realizes math app!