सूतगिरण्यांना सौरची मिळणार उर्जा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जयसिंगपूर (कोल्हापूर) ः राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना सौरऊर्जेचे प्रकल्प राबविण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज मंत्रालयातील आढावा बैठकीत दिली. वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते. या वेळी वस्त्रोद्योग आयुक्त माधवी खोडे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

राज्यात 140 सहकारी सूतगिरण्या असून सर्वसाधारण प्रवर्गातील 114, मागासवर्गीय प्रवर्गातील 23 आणि आदिवासी प्रवर्गातील 3 सूतगिरण्या आहेत. त्यातील पूर्ण उत्पादनाखालील 36 सूतगिरण्या असून अंशत: उत्पादनाखालील 33 तर उभारणीखालील 27 सूतगिरण्या आहेत. राज्यातील उत्पादनाखाली असलेल्या सहकारी सूतगिरण्यांना पुनर्वसनासाठी थकित वैधानिक देणी व अन्य आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून कर्जरुपाने अर्थसहाय्य देण्यात येते. या आर्थिक वर्षात 5 कोटीचा निधी आहे असे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

सूतगिरण्यांना सौरऊर्जेवर वीज पुरवठा देण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे. सहकारी सूतगिरण्या तोट्यात असल्याने अपारंपरिक ऊर्जा व वस्त्रोद्योग विभागाने पुढाकार घेतल्यास सौरऊर्जेचे प्रकल्प सुरू करता येतील. शासन सहकारी सूतगिरण्यांना सवलतीच्या दराने वीज देते. या सूतगिरण्या सौरऊर्जेवर सुरू केल्यास कायमस्वरुपी उपाय होण्यास मदत होणार असून शासनाला सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता भासणार नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येई असेही त्यांनी सांगितले.

सवलत पूर्ववत करणार 
27 अश्‍वशक्तीवरील यंत्रमाग उद्योगाला वीज दर सवलतीत 1 रुपये 22 पैशांची सवलत पूर्ववत करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली असून गुजरात आणि कर्नाटकचा अभ्यास केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल असे बैठकीत ठरले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spinning mil use Sour Enerjey kolhapur marathi news