झरे परिसरामध्ये जनता कर्फ्यू ला उस्फूर्त प्रतिसाद...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

आज सकाळपासूनच झरे व परिसरातील गावांमध्ये गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी दुकाने व अन्य उद्योग धंदे पूर्णपणे बंद ठेवले आहेत.

झरे (सांगली) - येथे व परिसरामध्ये जनता कर्फ्यू ला चांगला प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासूनच झरे व परिसरातील गावांमध्ये गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी दुकाने व अन्य उद्योग धंदे पूर्णपणे बंद ठेवले आहेत. मेडिकल व दवाखाना सोडून बाजारपेठांमध्ये पान टपरी, किराणा, स्टेशनरी दुकाने अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

कराड - पंढरपूर महामार्गावर तुरळक अन्यथा महामार्गावर ती सुद्धा वाहनांचा शुकशुकाट आहे.एरवी ग्रामीण भागामध्ये कधीही बंद पाळला जात नाही परंतु या वेळेला जनता कर्फ्यू हा शंभर टक्के पळाला आहे. शेतीची सर्व कामे शेतकर्‍यांनी बंद ठेवली आहेत. वाहनांची चाके थांबली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous response to public curfew in zare

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: