आजपासुन लालपरी पूर्ण क्षमतेने धावणार पण मास्क मात्र घालावे लागणार

ST buses are start from today with full capacity of passengers in kolhapur
ST buses are start from today with full capacity of passengers in kolhapur
Updated on

कोल्हापूर : एसटी बसेसना आजपासुन पूर्ण आसन क्षमतेन चालवण्यास शासनाने परवानगी दिली असून प्रत्येकाने मास्क वापरणे व हात निर्जंतुक करणे बंधनकारक केले आहे.
वीस ऑगस्टपासून राज्यभरात एसटी बस सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली होती; परंतु एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासी घेऊन प्रवास करणे बंधनकारक होते.

याबाबत एसटी महामंडळाने शासनाकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार शासनाने प्रत्येक प्रवासी व कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे व निर्जंतुक करणे या अटीवर बसेसच्या पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली पाच महिने अत्यावश्‍यक सेवा वगळता राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर शासनाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूक सुरू केली.

सद्यस्थितीला दिवसभरात एसटीच्या सुमारे ५ हजार बसेस राज्यभरात धावत असून या बसेसद्वारे सरासरी ५ ते ६ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास, भविष्यात कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त लोकांची ने-आण करणे शक्‍य होणार आहे. प्रवासादरम्यान प्रत्येकाने मास्क लावणे व आपले हात निर्जंतुक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर एसटीच्या बसेस वारंवार निर्जंतुक करण्यात येणार आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com